Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाने दक्षिणेकडे त्रिचनापल्ली वगैरे प्रांत घेतले. तो आरंभी जैन धर्माचा होता, परंतु पुढे शैव झाला. पल्लव वंशाचा विशेष उत्कर्ष महेंद्रवानंतरचा राजा नरसिंहवर्मा याचे कारकीर्दीत झाला ( इ० स० ५२६ ते ६४५ ). इ० स० ६४२ त त्याने दुसऱ्या पुलकेशीची वातापी नांवाची राजधानी काबीज केली व दक्षिण हिंदुस्थानांत पल्लव राजा सर्व राजांत प्रबळ झाला. त्याचा अंमल म्हैसूरपासून महाराष्ट्रापर्यंत झाला. ____ त्याचे कारकीर्दीत हिउएनत्संग हा कांचीस आला होता ( इ० स० ६४० ). त्याने जे वर्णन दिले आहे, त्यावरून असे दिसते की, कांची शहराचा विस्तार पांच सहा मैलांचा होता. पल्लवाचे राज्यांत शंभर बौद्ध मठ असून त्यांत दहा हजारांवर भिक्ष रहात असत. ते सर्व महायान पंथापैकी स्थविर संप्रदायाचे होते. हिंदु व जैन लोकांची सुमारें ऐशी मंदिरे होती. दिगंबर जैनही बरेच होते. पांड्य देशांत बौद्ध धर्म बहुतेक नष्ट झाला होता. प्रसिद्ध नालंद पाठशाळेचा मुख्य अध्यापक धर्मपाल याचा जन्म कांची येथे झाला होता. कांची हे क्षेत्र हिंदुस्थानांतील सात प्रसिद्ध क्षेत्रांपैकी आहे हे सांगावयास नको. तेथील कैलास नांवाचें भव्य मंदिर दुसरा नरसिंहवमा याने बांधले. इ० स० ६५५ चे सुमारास विक्रमादित्य चालुक्यानें परमेश्वरवर्मा नांवाचे पल्लव राजाचा पराभव करून कांची शहर घेतले, व तें चालुक्यांकडे काही दिवस राहिले. ___ या दोन राष्ट्रांच्या लढाया वर लिहिल्याप्रमाणे सारख्या चालूच होत्या. इ० स० ७४ ० त दुसरा विक्रमादित्य चालुक्य याने नंदीवर्मा पल्लवाचा पराभव करून कांची शहर घेतले. तेव्हांपासून पल्लव राज्याला जी उतरती कळा लागली ती कायमचीच लागली..