Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६३ पूदुकोट्टाईचा राजा हा कल्लर जातीचा मुख्य आहे व तो आपल्यास पल्लव राजा म्हणवून घेतो. तेव्हां कल्लर व मवर जातींप्रमाणेच पल्लव ही लुटारू लोकांची एक जात असावी. यांचे राज्यास इ. स. चे तिसरे शतकापासून म्हणजे आंध्र साम्राज्य मोडल्यापासून आरंभ झाला असावा. सगुद्रगुप्ताने इ. स. ३५० त ज्या विष्णुगोप नांवाच्या राजाचा पराभव केला तो कांचीचा पल्लव राजाचा होता. हस्तिवाही पल्लव राजाच होय. इ. स. ५५० पासून इ. स. ७५३ सालापर्यंत पल्लव व चालुक्य यांच्या एकसारख्या लढाया चालूच होत्या. इ. स. ९७६ साली सिंह विष्णु नांवाचा पल्लव राजा होता. त्याने सीलोनचे राजे व तीन तामिल राजे यांचा पराभव केला. सिंहविष्णूचा मुलगा महेंद्रवर्मा (इ. स. ६०० ते ६२५ ) याने त्रिचनापल्ली, चिंगलपट, व उत्तर व दक्षिण अर्काट प्रांतांत पुष्कळ कोरीव लेण्याची मंदिरे बांधली. महेंद्रवाडी नांवाचे शहराजवळ त्याने बांधलेल्या इमारतीच्या व तलावांच्या खुणा दिसतात. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी यानें महेंद्रवर्माचा इ. स. ६.९ किंवा ६१० या साली एका मोठ्या लढाईत पराभव केला. त्या सुमारास चालुक्य राजाने पल्लवांचा उत्तरेकडील वेंगी प्रांत घेतला, व त्या प्रांताचा कारभार त्याने आपल्या धाकट्या भावाकडे सोपविला. महेंद्रवाने दक्षिणेकडे त्रिचनापल्ली वगैरे प्रांत घेतले. तो आरंभी जैनधर्माचा होता, परंतु पुढे शैव झाला. ___ महेंद्रवर्माचा इ० स० ६०९ किंवा ६१० या साली एका मोठ्या लढाईत पराभव केला. त्या सुमारास चालुक्य राजानें पल्लवांचा उत्तरेकडील वेंगी प्रांत घेतला, व त्या प्रांताचा कारभार त्याने आपल्या धाकट्या भावाकडे सोपविला. त्यानंतर महेंद्र