Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क्षण ब्रह्मदेशात मरण पावगीको १६२ दक्षिण ब्रह्मदेशांत असलेल्या कादारम बंदरावर पाठविले. तो इ. स. १०३५ त मरण पावला. त्याने सोळा मैल लांबीचा बंधारा बांधून प्रचंड तलाव बांधला व गंगैकोंड चोलपुरम् नांवाची राजधानी स्थापन केली. राजराजानंतर त्याचा मुलगा राजाधिराज गादीवर बसला. इ. स. १०५२ त चालुक्यांशी म्हैसुरांत कोप्पम येथे लढाई करीत असतां तो मरण पावला. त्याच्या नंतर त्याचा भाऊ राजेंद्र दुसरा हा गादीवर बसला. त्यानंतर वीरराजेंद्र चोल याने चालुक्यांचा पराभव केला पुढे अधिराजेंद्र नांवाचा राजा झाला. त्याचे राज्यांत प्रसिद्ध रामानुजाचार्य हे झाले अधिराजेंद्र शैव असल्याकारणाने रामानुजाचार्य म्हैसूर प्रांतांत राहावयास गेले.त्याचे मरणानंतर ते श्रीरंगला परत आले. नांव घेण्यासारखा शेवटचा चोल राजा म्हणजे कुलोत्तुंग चोल तिसरा हा होय. त्याने इ. स. १२८७ पासून १३२७ पावेतों चाळीस वर्षे राज्य केले. परंतु मलिक काफरच्या स्वारीमुळे सर्व हिंदु राज्ये बलहीन झाली. पुढे इ. स. १३७० सालीं विजयानगरचे राज्य उदयास आले. पल्हव राजे. पल्लव व पल्हव हे दोन शब्द फार सारखे असले करणाने ते एकाच जातीचे दर्शक असून ते लोक दक्षिण हिंदुस्थानांत इराणांतून आले अशी आजपर्यंत बहुतेक विद्वानांची समजूत होती. परंतु अलीकडील शोधावरून असे दिसते की, दक्षिण हिंदुस्थानांतील पल्हव लोक हिंदुस्थानांतलिच मूळचे रहिवाशी होते. ते व कुरुंब नांवाचे लोक एकच आहेत किंवा नाहीत हे खात्रीने सांगतां येत नाही. परंतु ते तामिल लोकांपासून भिन्न असावेत, कारण त्यांच्या व तामिल लोकांच्या वारंवार लढाया होत असत. कल्लर व मर्वर या रामोशांच्या जाती व पल्ली ही जात पल्लव जातीपैकीच आहेत.