________________
बेट घेतले. चाय होते व त्याने लकदिव व किरकोळ राजे झाले, परंतु त्यानंतर मात्र एकामागुनएक असे तीन पराक्रमी राजे गादीवर बसले. त्यांची नांवें राजराज देव, राजेंद्र चोलेदेव व राजाधिराज अशी होती. यांपैकी राजराज देव याने बहुतेक सर्व मद्रास इलाखा, सीलोन व म्हैसूरचा बराच भाग इतके प्रांत आपले ताब्यांत आणले. त्याने आपल्या कारकीर्दीच्या बाराव्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत वेंगीचे पूर्व चालुक्याचे राज्य मिळविले. पुढे तीन वर्षांत मलबार किनाऱ्यावरील किलोन ( कोल्लम ) व कलिंगाचे उत्तर राज्य हे त्याचे ताब्यात आले. त्याने आपल्या राज्याच्या विसावें वर्षी सीलोन बेट घेतले. चालुक्यांशी चार वर्षे लढाई करून त्यांनाही त्याने जिंकले. राजराजाजवळ प्रबळ आरमारही होते व त्याने लकदिव व मालदिव ही बेटे घेतली. तंजावरचे भव्य मंदिर त्याच्याच आज्ञेवरून बांधले. त्या . मंदिराचे भिंतीवर त्याचे विजयाचे इतिहासाची चित्रं खोदली आहेत. ते मंदिर अद्यापपावेतों उत्तम स्थितीत राहिले आहे. राजराज हा स्वतः जरी शिवभक्त होता तरी निगापट्टम बंदरावरील ब्रह्मी लोकांच्या बुद्धाचे मंदिरास त्याने उदार देणग्या दिल्या. या मंदिराचे दर्शनास दूरदूरचे यात्रेकरू पंधराव्या शत. कापर्यंत येत होते. इ. स. १८६७ सालापर्यंत यापैकी एक मंदिर पडक्या स्थितीत उभे होते. त्या साली ते जेसूट फादर्स नांवाच्या ख्रिस्ती पाद्यांनी पाडून टाकले, व ख्रिस्ती इमारती बांधण्याकडे त्याच्या दगडांचा उपयोग केला. राजराजाचा मुलगा राजेंद्र चोलदेव हा आपले बापाप्रमाणे शूर व महत्त्वाकांक्षी होता. तो इ. स. १०१२ त गादीवर बसला. तो ओरिसा व बंगाल प्रांतापर्यंत देश जिंकीत गेला व त्याने आपले आरमार