________________
येथे आला, त्या वेळेस चोल राज्याचा विस्तार चार पांचशे मैल होता, असे तो म्हणतो. त्याच्या राजधानीचा विस्तार दोन मैलांपेक्षाही कमी असून हा सर्व प्रदेश निर्जन होता. लोक रानटी व दरवडेखोर होते, बौद्ध धर्माचे मठ फार थोडे होते, व जे होते ते गलिच्छ व मोडकळीस आलेले होते. त्यांत राहणारे यतीही असेच गलिच्छ होते. मुख्य धर्म जैन होता. परंतु काही ब्राह्मणांची देवळेही होती. अमरावतीचे नैर्ऋत्य दिशेस सुमारे दोनशें मैल अंतरावर हा प्रांत असावा असे त्यांचे म्हणणे आहे. ह्यावरून हल्ली कडाप्पा जिल्हा जेथे आहे, तेथेच हा प्रांत असावा असे अनुमान होते. कारण इ. स. १८०० पर्यंत त्या प्रांतांत दरोडेखोर लोक पुष्कळ होते; व हि-उएन-त्संगानें वर्णन केल्याप्रमाणे या प्रांतांतील हवा फार उष्ण असून त्यांत दलदली व जंगले पुष्कळ आहेत, व प्रांतही निर्जन आहे. हि-उएन-त्संगाने तेथील राजाचा उल्लेख केलेला नाही यावरून तो बलाढ्य पल्हव राजा नरसिंहवर्मा याचे ताब्यातील एक किरकोळ राजा असावा असे दिसते. नवव्या शतकांत मात्र परांतक नांवाचे राजाने आपल्या पराक्र माने चोल राजांचा अधिकार वाढविला. त्याने सीलोनवर स्वार करून जय मिळविला.पल्हव राज्याच्या मध्य भागापर्यंत त्याने आपल सैन्य नेले असावे असे उत्तर अर्काट व चिंगलपट जिल्ह्यांतील लखा वरून दिसते. त्या लेखांत ग्रामसंस्थांची पूर्ण माहिती दिली आह: गांवोगांवची सर्व कामें पंचायतोमार्फत कशी चालत होती, ह त्यावरून चांगले समजतें. परांतकाचा मुलगा राजादित्य हा गादीवर बसल्यानंतर दार वर्षातच राष्ट्रकूटाचा राजा तिसरा कृष्णराज याच्याशी त्या लढाई झाली, तींत तो मरण पावला (इ. स. ४९४ ). त्या पुढे सुमारे ३६ वर्षे राज्यांत अव्यवस्था होती. त्या मुदतीत ।