________________
१६९ १२५१-१२७१ ]. इ० स० १३१० साली मलिककाफरनें जी या प्रांतांवर स्वारी केली त्या स्वारीचा अर्थात् बराच परिणाम झाला. परंतु हा वंश त्यामुळे अगदीच बुडाला नाही. ___ चेर, केरळ व सत्यपुत्र या वंशाबद्दल फार थोडी माहिती आहे. सत्यपुत्राचे नांव अशोकाचे लेखांत मात्र आढळतें. केरळ हे नांव अद्याप प्रसिद्ध आहे. तो प्रांत कोंकणाच्या खाली दक्षिणेस मलबार किनाऱ्यावर आहे. त्याची प्राचीन राजधानी वंजी हे शहर होते. हल्ली त्या ठिकाणी कोचीनजवळचें तिरूकरूर हे गांव आहे. त्रावणकोरचे राजाची विश्वसनीय माहिती इ० स० ११२५ पासून पुढची मि० पी० सुंदरम-पिलई यांनी मिळवून एक उपयुक्त ग्रंथ लिहिला आहे. चोल राज्य. चोल राज्य हे बरेंच विस्तृत होते. तें पूर्व किनाऱ्यावर नेलर शहरापासून पुदुकोटाई शहरापर्यंत व पश्चिमेस कुर्ग प्रांताचे सरहद्दीपर्यंत होते. म्हणजे त्यांत मद्रास व पूर्वेकडील दुसरे जिल्हे व म्हैसूर संस्थान इतक्यांचा समावेश होतो. त्याची प्राचीन राजधानी उरयूर म्हणजे जुनी त्रिचनापल्ली ही होती.पाणिनी चोल राज्याचा उल्लेख करीत नाही, परंतु कात्यायन आपल्या ग्रंथांत त्याचा उल्लेख करितो. अशोक राजा यास स्वतंत्र संस्थान समजत असे. _चोल राजांपैकी पहिला इतिहासप्रसिद्ध राजा म्हणजे करिकाल नांवाचा होय. तो इ. स. चे दुसरे शतकांत राज्य करीत असावा. त्याने काविरिपद्विनम नांवाचें नगर स्थापन केले. त्याचे नंतर त्याचा नातू नेदुमुदि किल्ली गादीवर बसला. पुढे सातव्या शतकापावेतों चोल राजाचा इतिहास माहीत नाही. इ. स. ६४ ० त हि-उएन-त्संग हा पल्हवांची राजधानी कांची हतो इ. स. नवाचे नगर स्थापन. पुढे