पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर त्या पांड्य सदर राजा धर्माच्या जिल्ह फार थोडे होते. ते व्यापारधंद्यांत अगदीं निमग्न होऊन गेले होते. बौद्ध धर्माचे मठ सर्व पडून गेले होते. त्या धर्माचे अनुयायी फार थोडे राहिले होते. सर्व देशभर ब्राह्मणांचीच शेंकडों देवळे दिसत होती. जैन धर्माचेही बरेच लोक होते. इ० स० ९९४ चे सुमारास पांड्य राज्य चोल राजा राजराज याचे मांडलिक बनले होते. पांड्य राजांची जैन धर्मावर बरीच भक्ति होती. परंतु या संबंधानें एक कथा आहे ती अशी:सुंदर नांवाचे पांड्य राजाशी एका चौल राजपुत्रीचे लग्न झाले. तिने त्या पांड्य राजाला जैन धर्मापासून परावृत्त करून शिवभक्त केले. तेव्हापासून सुंदर राजा आपल्या पूर्वीच्या सधर्मियांचा फार छळ करूं लागला. त्याने या धर्माच्या आठ हजार निरपराधी माणसांस सुळावर चढवून ठार मारले. अर्काट जिल्ह्यांतील त्रिवतूर गांवांतील देवळांत भिंतीवर काही चित्रं खोदली आहेत. त्यांत या दंतकथेचा देखावा दाखविला आहे. पांड्य वंशाचे कारकीर्दीत इ० स० ११६६ साली सीलोनचा राजा पराक्रमबाहू याने पांड्य राजावर स्वारी केली. त्या स्वारीची दोन वर्णने आहेत. एक सीलोन बेटांतील महावंशनामक ग्रंथांत, व दुसरे कांचीनजीक आर्यकम येथील चोल लेखांत. यापैकी चोल लेखांत असे लिहिले आहे की, सीलोनच्या सेनापतीस आरंभी कांहीं जय मिळाला; परंतु शेवटी दक्षिण प्रांतांतील राजे एकत्र झाल्यामुळे सीलोनच्या सैन्यास परत फिरावे लागले. वीर व सुंदर ह्या नांवाच्या दोन वारसांमध्ये पांड्य राजाचे गादीवर वाद उत्पन्न झाला, म्हणून ही सीलोनची स्वारी झाली होती. - प्रो० कीलहॉर्न यांनी इ० स० ११०० पासून १९६७ पावेतों सत्रा पांड्य राजांच्या नांवांचा पत्ता लावला आहे. त्यांत जटावर्म सुंदर नांवाचा राजा बराच प्रबळ होता. [ इ० स०