________________
१५७ ती बहुतेक ठायबीरीयस व नीरो बादशहाच्या टंकसाळींतील होती. यावरून पांड्य राजाच्या वेळेस या प्रांतांत सोन्याचे नाणे चालत होतेसे दिसते, आणि असे स्पष्ट सिद्ध होते की, ख्रिस्ती शकाचे आरंभी पांडयाचे राज्यांतून व मलबारांतील चेर राज्यांतून रोमन लोकांचे राज्यांत फार माल जात होता. त्या व्यापारामुळे चेर व पांड्य प्रांताचे लोकांना फार नफा होऊन रोमन लोकांचे नुकसान होतैसे दिसते. कारण टायबीरियस बादशहाने रोमच्या सीनेटला एक पत्र लिहिले त्यांत तो म्हणतो, " आपला [ रोम लोकांचा । मुळचा साधेपणा आपणांत कसा परत येईल ? कपड्यालत्त्यासंबंधाने लोकांत जे नवे नवे चार निघाले आहेत त्याला काय इलाज करावा ? बायकांमध्ये जी डामडौलाची, व विशेषेकरून हिरे, माणिक, मोती वगैरेंची हाव उत्पन्न झाली आहे ती कशी बंद करितां येईल ? या चौचालपणाच्या ढंगामुळे आपल्या देशांतील संपत्ति हिंदुस्थानांत जाऊन त्याऐवजी नकली पदार्थ आपल्या देशांत येतात. त्याचा परिणाम असा झाला आहे की, रोमन चलनी नाण्यांची किंमत कमी होऊन शेवटी ते कोणी घेईनासे झाले आहे. " समुद्रांतून मोती काढण्याचा धंदा या पांड्य राजाकडेच होता. प्रथम त्याचे ठिकाण कोर्काई येथें होतें, व नंतर कायल शहर झाले. . दसरे शतकांतील नेडम चेल्यन नांवाचे राजाशिवाय दुसऱ्या कोणत्याही राजाचे नांव खात्रीने कळत नाही. या वंशाचा पांचवे शतकानंतरचा व्यवस्थेशीर इतिहास लिहिण्यासारखी सामग्री उपलब्ध नाही. इ० स० ६४० त हि-उएन-त्संग या प्रांतांत आला तेव्हां त्याचे नजरेस असें आले की, येथील लोकांचे लक्ष विद्येकडे १ ( मॉडर्न रिव्हू, डिसेंबर १९१३ पान ५६७).