________________
चेर राज्यच असावे व त्या राज्याची भाषा मल्याळम् ही होती.. चोल व पांड्य राज्यांत तामिल भाषा होती. ___ या प्रांतांत आर्यांचे भाषेचा प्रवेश मुळीच झाला नाहीं व तेथील लोकांचे उत्तरहिंदुस्थानांतील लोकांशी दळणवळण नव्हते.. परंतु दर्यावर्दी व्यापारामुळे त्यांचा संबंध दुसऱ्या देशाशी येत होता. मानारचे आखाताची मोती, कोइमतूरची बेरिल नांवाची रत्ने व मलबारची मिरी हे जिन्नस दुसरीकडे कोठेही मिळत नसल्या कारणाने ते परदेशचे व्यापारी या प्रांतांतूनच नेत होते. इ० स० चे पूर्वी सातवे अथवा आठवे शतकापासूनच या जिनसांना परदेशाकडून फार मागणी होती. दक्षिणहिंदुस्थानच्या राजकीय इति. हासाची माहिती फारच थोडी आहे. परंतु द्राविडी लोकांत सुधारणा ही उच्च स्थितीप्रत पोचली होती यांत शंका नाही. ब्राह्मणी धर्म व आर्य लोकांची संस्कृति या प्रांतांत कोणत्या काळी आली हे कळण्यास मार्ग नाही. परंतु अजमासाने इ० स० पूर्वी पांचवे शतकांत आली असावी असें साधारण मत आहे. इ० स० नंतरच्या दुसऱ्या शतकापूर्वीचे लेख तेथे मिळत नाहीत. त्या प्रांतांत ऐतिहासिक लेखांची जरी अगदी गर्दी आहे तरी त्यांच्यांत फार प्राचीन लेख असे नाहीत. अशोकाचे उपदेशकांनी बौद्ध धर्म या प्रांतांत आणला व त्याचा भाऊ महेंद्र याने चोल प्रांतांत एक. मठ बांधला. . चोल व पांड्य वंशांचा व्यवस्थित इतिहास इ० स० चे नववे दहावे शतकापर्यंतचा मिळत नाही. पुदुकोटाचे पल्लव राजांचा इतिहास दुसऱ्या शतकापासून थोडासा उपलब्ध आहे. परंतु हे पल्लव लोक द्राविडी लोकांपकी नव्हत.