Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काणी सांपडतात. यावरून त्या रत्नांचा तेथे मोठा व्यापार चालत होता हे सिद्ध होते. ___तामिल राजांजवळ मोठे आरमार होते आणि युरोपकडील जहाजे त्यांच्या जवळून मिरी, मोती व बेरिल रत्ने विकत घेण्यास येत व त्यांना युरोपांतील सोने, चांदी वगैरे जिनसा देत. या वेळी पुष्कळ रोमन लोक इकडे कायमचे येऊन राहिले, व तामिल राजांचे नोकरीस जे धिप्पाड यवन व न बोलणारे म्लेंच्छ असल्याचे वर्णन आहे ते हे युरोपियन लोक होत. ___ या प्रांताचा इ० स० चे नववे शतकाच्या पूर्वीचा खात्रीलायक इतिहास लिहिण्यापुरती साधने उपलब्ध नाहीत. मि० एस कृष्णस्वामी आयंगार यांनी ' प्राचीन हिंदुस्थान ' ( Ancient India) नांवाचा इंग्रजीत ग्रंथ लिहिला आहे, त्यांत जरी पुष्कळ उपयुक्त माहिती आहे, तथापि ती सुद्धा अद्याप पुष्कळ अंशी अपूर्ण आहे. त्याचा उपयोग मि० स्मिथ यांनी पांड्य, चोल व चेर या राज्यांची हकीकत लिहितांना पुष्कळ केला आहे. तिनेवल्ली जिल्ह्यांत ताम्रपर्णी नदीच्या मुखाशी कोकई नांवाचें एक शहर होते. ते पांड्य राजांचे राजधानीचे शहर होते. तेथे तिघे भाऊ होते. या तिघां भावांनी पांड्य, चोल व चेर अशी तीन राज्य स्थापन केली, अशी दंतकथा आहे. यांपैकी पांड्य राज्य हिंदुस्थानच्या अगदी दक्षिण टोकास होते. चोल राज्य उत्तरेस नेलोरपर्यंत होते व चेर राज्य पश्चिम किनाऱ्यास होते. ही तिन्ही राज्ये द्राविडी लोकांची होती, व त्यांची भाषाही द्राविडी होती. अशोकाचे वेळेस चोल व पांड्य ही राज्ये प्रसिद्ध होती; परंतु चेर राज्याच्या ऐवजी केरळ आणि सत्यपुत्र अशी राज्ये असल्याचे अशोकाचे लेखावरून दिसते. परंतु हे केरळ राज्य म्हणजे