Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५३ । पुढें कांहीं कालाने जैन, बौद्ध व हिंदु धर्माचा या प्रांतांत प्रवेश झाला. इ. स. चे पू. ३०९ सालाचे सुमारास उत्तर हिंदुस्थानांत जेव्हां बारा वर्षांचा एक मोठा दुष्काळ पडला, त्या वेळेस तिकडून काही लोक आले, व मैसूर प्रांतांत श्रवण वेलगोल येथे येऊन राहिले. त्यांच्यांतील भ्रद्रबाहु नांवाचा जो मुख्य साधू होता तो जैन धर्माप्रमाणे उपोषणे करीत असतां मृत्यु पावला. श्रवण बेळगोल येथील सांप्रतचे मठाधिपति हे सदर भद्रबाहूचे वंशज आहेत असें मानितात. __ अशोकराजाने आपला भाऊ महेंद्र व दुसरे बौद्ध उपदेशक या प्रांतांत नि. पू. तिसऱ्या शतकाच्या मध्याच्या सुमारास पाठविले. परंतु बौद्ध धर्माचे प्राबल्य दक्षिणेत फारसे कधीच झालें नाही. इ. स. च्या सातवे शतकांत जैन व हिंदु धर्माच्या तेजापुढे बौद्धधर्म मृतप्राय झाला होता. मेग्यास्थिनीजने लिहिले आहे की, तामिल लोकांत गुलामगिरी मुळीच नव्हती. हे म्हणणे जरी पूर्णपणे खरे नसले तरी धंद्यांचा विभाग पूर्णपणे झाला असल्या कारणाने शेतकरी लोकांस लढाईचे वेळेस वगैरे जुलमाने आपली कामें सोडून देण्याचा प्रसंग येत नसे. ___ तामिल प्रांतांत मिरी, मोती व बेरिल नांवाची रत्ने उत्तम होत असत. हे जिन्नस दुसरीकडे कोठेही पैदा होत नसल्या कारणाने त्यांची किंमत युरोपांत फार येत असे. इ. स. ४०९ सालांत गॉथ लोकांचा पुढारी अलारिक यानें रोम शहरापासून जी खंडणी मागितली, त्यांत त्याने तीन हजार रत्तल मिऱ्यांची मागणी केली. बेरिल रत्नांच्या तीन ठिकाणी खाणी होत्या; ( १ ) कित्तूरनजीक पुन्नात. ( २ ) कोइमतूरजवळ पड्यूर; (३) सालेम जिल्ह्यांत बानियबादि या तीन प्रदेशांत रोमन नाणी अद्याप पुष्कळ ठि