पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ जिवंतपणीच कातडे काढून अखेर त्याचा शिरच्छेद केला. या रीतीनें यादव वंशाचा शेवट वाईट रीतीने झाला. . हेमाद्रि ऊर्फ हेमांडपंत नांवाचा प्रसिद्ध संस्कृत ग्रंथकर्ता रामचंद्र व महादेव यांच्या कारकीर्दीत होऊन गेला. त्याने हिंदूंच्या कर्मकांडाची व्यवस्था लावली. धर्मशास्त्रावर महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. लंकेहून मोडी लिपी आणली, अशी दंतकथा आहे. परंतु त्याबद्दल काही पुरावा मिळत नाही. त्याने आपल्या अन्नदात्या राजांचे एक उत्तम चरित्र लिहिले आहे. भाग १४ भाग १९ दक्षिण हिंदुस्थानांतील राज्ये. कृष्णा व पंचंगगा नद्यांच्या दक्षिणेचा जो हिंदस्तानचा प्रदेश आहे त्या प्रदेशाचा इतिहास ह्या भागांत देत आहो. साधारणपण मद्रास इलाख्यांतील विजगापट्टम व गंजम हे दोन जिल्हे वगळून मैसूर, कोर्चान आणि त्रावणकोर हे प्रांत मिळन जो भाग होतो तो हा प्रदेश होय. ग्रीक भूगोलवेत्ता टॉलेमी याने या प्रांताला 'दमीरिके' असें नांव दिले आहे. त्याचे वेळेस (इ.स. १४ ० ) बिल्लवर ह्मणजे भिल्ल व मीनवर ह्मणजे कोळी या लोकांची या प्रांतांत वस्ती होती. तामील लोक हे येथे मागाहून आले. त्या सर्व लोकांत भूतपिशाचांची पूजा करण्याचा धर्म होता. पुढ तीन राज्यांची हकीकत सांगावयाची आहे, त्या राज्यांशिव सुमारे १२० लहान-मोठे राजे या प्रांतांत होते. त्यांच्या आ आपसांत सारख्या लढाया होत असत.