________________
१५१ राजाचे बरेच प्राबल्य होते. बिट्टिदेव ऊर्फ बिट्टिग नांवाचा राजा इ. स. १११७ त प्रसिद्धीस आला. त्याने दोरसमुद्र (सांप्रतचें हालेविद ) येथे आपली राजधानी स्थापन केली. त्याचे राज्यांत त्याचा प्रधान गंगराज याच्या आश्रयामुळे जैन धर्मास चांगले उत्तेजन मिळाले, व चोल राजाने जैनांची जी देवळे पाडून टाकली होती त्यांचा जीर्णोद्धार झाला. परंतु पुढे रामानुज आचार्याची गांठ पडल्यावर, बिट्टिदेव राजा वैष्णव झाला व विष्णवर्धन अथवा विष्णु असें नांव त्याने धारण केले. चोल, पांड्य व चेर राजांचा विष्णूनें पराजय केला. इ. स. ११९१-९२ मध्ये वीरबल्लाळ याने देवगिरीच्या यादवांचा पराजय केला. इ. स. १३१० चे सुमारास मलिककाफर व ख्वाजाहाजी यांनी होयसल प्रांतावर स्वारी केली, तेथील राजास कैद केले व त्याची राजधानी लुटली. इ. स. १३२७ त या राजधानीचा मुसलमान फौजेनें समूळ नाश केला. देवगिरीचा यादव वंश सुमारे ११९१ पासून १३१८ पर्यंत होता. त्या वंशांतील सिंघण नांवाच्या राजानें गुजराथ व इतर प्रांतांवर स्वाऱ्या केल्या. थोडा वेळपर्यंत त्याचे राज्य चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्याइतकेंच विस्तृत होते. इ. स. १२९४ साली अल्लाउद्दीन खिलजाने या प्रांतावर स्वारी केली, तेव्हां रामचंद्र राजाने सहाशें मण मोती व दोन मण हिरे, माणके पांच इ. मौल्यवान रत्ने देऊन आपला प्राण वाचविला, असें ह्मणतात. परतु पुढे इ. स. १३०९ त मलिककाफरने स्वारी केली तेव्हां रामचंद्र राजा शरण गेला व यादव वंशाचा शेवटचा स्वतंत्र राजा नाहीसा झाला. त्याच्या मरणानंतर त्याचा जावई हरपाल याने इ. स. १३१८ त बंड केले. परंतु त्याचा पराभव होऊन तो कैद झाला. त्याचे