________________
चेदीचा राजा कर्ण याचा पराभव केला. इ. स. १०६८ त सोमेश्वराला असाध्य ज्वर आला तेव्हां त्याने तुंगभद्रा नदीत जीव दिला. इ. स. १०७६ त बिल्हणच्या काव्याचा नायक सहावा विक्रमादित्य ऊर्फ विक्रमांक हा गादीवर आला. त्याने सुमारे ५० वर्षे राज्य केले. त्याचे कारकीर्दीत अॅसुरांतील दोरसमुद्र येथील होयसल वंशाचा राजा विष्णु याच्याशी जरी लढाई झाली, तरी एकंदरीने बरीच शांतता होती. त्याची राजधानी निजामसरकारचे राज्यांतील कल्याणी नांवाचे शहर होते. मिताक्षराचा कर्ता विज्ञानेश्वर हा तेथील रहिवाशी होता. विक्रमांकाचे मरणानंतर चालुक्य वंशास उतरती कळा लागली. इ. स. ११५६ ते ११६२ मध्ये सेनापति विज्जलकलचुरी याने बंड केलें, व राज्याधिकार बळकाविला.. पुढे ११८३ साली चौथ्या सोमेश्वराने राज्याचा काही भाग जरी परत घेतला, तरी देवगिरीचे यादव व दोरसमुद्राचे होयसल राजे यांच्यापुढे त्याच्याने टिकाव धरवेना. शेवटी इ. स. ११९० साली कल्याणीचा चालुक्य वंश समाप्त झाला, असें ह्मणण्यास हरकत नाही. विज्जलचे कारकीर्दीत शैव संप्रदायास विशेष जोर आला. व त्या वेळेस वीरशैव अथवा लिंगायत धर्माची स्थापना झाली.. विज्जल हा स्वतः जैन होता. त्याने लिंगायत संप्रदायाच्या दोन साधूंचे डोळे काढले. त्यावरून ११६७ त त्याचा स्वतःचा वध झाला. लिंगायत धर्माची स्थापना विज्जलाचा ब्राह्मण प्रधान बसव याने केली होती. व्यापारी लोकांपैकी पुष्कळांनी लिंगायत धर्माचा स्वीकार केल्यामुळे बौद्ध व जैन धर्म अगदीच मागे पडले. बाराव्या शतकाचे मध्याचे पुढे दक्षिणेत बौद्ध धर्माचा कांहीं मागमूसही सांपडत नाही. बाराव्या व तेराव्या शतकांत झैसूर प्रांतांत होयसल वंशाच्या