________________
१४९ पदच्युत केले. इ. स. ९४९ साली तिसरा कृष्ण राष्ट्रकूट याच्या लढाईत चोलांचा राजा कृष्णादित्य रणमूमीवर मरण पावला. सिंध प्रांतांत आठवे शतकांत आरब लोक आले व त्यांनी आपला अंमल बसविला. राष्ट्रकूट राजे मोठे पराक्रमी असल्याचे त्यांचे ग्रंथकार लिहितात. ___ राष्ट्रकूट वंशांतील शेवटचा राजा दुसरा कक्क नांवाचा होता. त्याचा पराभव चालुक्य वंशांतील दुसरां तैलप याने ९७३ साली केला. या तैलप राजाने कल्याणीचे चालुक्य वंशाची स्थापना केली. तो वंश सुमारे २२५ वर्षे चालू राहिला होता. तैलप राजाने २४ वर्षे राज्य केले. त्याने धारच्या मुंज राजाचा पराभव केला. या मुंज राजाने तैलपाचा सहा वेळ लढाईत पराभव केला होता. परंतु शेवटी तो गोदावरी नदी उतरून आला तेव्हां तैलपाने त्याचा चांगला सूड उगविला. मुंज राजाने एकदां कैदेतून सुटून जाण्याचा यत्न केला, ह्मणून त्याच्या जेवणाखाणाची व्यवस्था केली होती ती बंद केली. तैलपाने त्याला दारोदार भिक्षा मागावयास लावलें, व शेवटी त्याचा शिरच्छेद केला (इ. स. ९९६). - पढ़ें दोन वर्षांनी तैलप मरण पावला. त्याचे नंतर त्याचा मुलगा सत्याश्रय हा गादीवर बसला. त्याचे राज्यांत चोलराजा राजराज हा सुमारे नऊ लक्ष फौज घेऊन आला, व त्याने त्याच्या राज्यावर हल्ला केला. राजराजाने फारच लुटालूट केली व ब्राह्मण आणि बायकामुले यांची सुद्धां कत्तल केली. इ. स. १०५९ त सोमेश्वराने राजाधिराजाचा पराभव करून त्यास ठार मारले. त्याने धार व कांची ही शहरें घेतली व . १ पहा. भाग १२ अंक७ .