पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ वगैरे देवांची मंदिरें अधिकाधिक होऊ लागली होती. जैन व बुद्ध लोकांप्रमाणे हिंदुलोकही कोरीव लेणी करूं लागले होते. प्रथम, हिंदूचे लेणे इ. सनाच्या सहाव्या शतकाच्या शेवटी मंगलेश राजाने वातापी नगरांत विष्णूचे मंदिर केलें तें होय. ____ इ. स. ७३५ त पारशी लोकांची हिंदुस्थानांतील पहिली वसाहत ठाणे जिल्ह्यांत संजान येथे स्थापन झाली. दंतिदुर्ग राष्ट्रकूटानें कांही जास्त प्रांत जिंकले, परंतु ७६० चे सुमारास त्याला त्याचा चुलता पहिला कृष्ण याने पदच्युत केलें. ___या कृष्णाचे वेळीच वेरूळ येथील डोंगरांत कोरलेलें प्रसिद्ध कैलास नांवाचे मंदिर तयार झाले. कोरीव लेण्यांत इतकें विस्तीर्ण व सुबक असें कैलासासारखें दुसरे कोणतेही लेणे नाही. कृष्णानंतर त्याचा मुलगा दुसरा गोविंद व पुढे ध्रुव हे त्याचे गादीवर आले. ( इ. स. ७७०) ध्रुवाचा मुलगा प्रसिद्ध तिसरा गोविंद हा होता. त्याने आपला अंमल विंध्याद्रीपासून कांची शहरापर्यंत बसविला. पण त्याचे प्रत्यक्ष राज्य तुंगभद्रा नदीपर्यंतच होते. त्याने आपले भावास लाट ऊर्फ दक्षिण गुजराथ या प्रांताचा प्रतिनिधि केले. ___ त्याच्या नंतरचा राजा अमोघवर्ष याने ६२ वर्षे राज्य केले. परंतु त्याचा बहुतेक काळ वेंगांचे पूर्व चालुक्याशी लढण्यांतच गेला. त्याने आपली राजधानी नाशिकाहून मान्यखेत ( मालखेड ) येथे नेली. त्याचे कारकीर्दीत दिगंबर जैनांचा चांगला उत्कर्ष झाला. त्यांचे मुख्य नायक जिनरोन व गुणभद्र हे होते. या प्रसिद्ध पुढायांच्या उद्योगामुळे जैन धर्माचा नवव्या व दहाव्या शतकांत उत्कर्ष होऊन बौद्ध धर्म मागे पडला. व बाराव्या शतकांत दक्षिण हिंदुस्थानांतून तो समूळ नाहीसा झाला. पुढे तिसरे इंद्र राजानें कनोजवर स्वारी केली, व महिपालास