________________
१४७ शीचे दरबारांत, इराणच्या राजाचा वकील आपल्या राजाकड़न आणलेला खलिता राजास देत असल्याचे चित्र काढले आहे. हि-उएन-त्संग हा पुलकेशीचे दरबारांत ६४० त आला होता. त्याला अजिंठ्याची कोरीव लेणी पाहून आश्चर्य वाटल्याचे त्याच्या लेखावरून दिसते. त्या वेळेस पुलकेशीची राजधानी वातापी येथे नसून नाशिक येथे होती असे दिसते. पुलकेशीच्या सैन्याची तयारी फार उत्तम असल्याचे त्संग याने लिहिले आहे. परंतु त्याची भरभराट फार दिवस टिकली नाही. इ. स. ६४२ त पल्लवांच्या लढाईचे स्वरूप अगदी बदलून, पल्लवांनी पुलकेशीचा पूर्ण पराभव केला. पल्लव राजाने त्याची राजधानी घेऊन लटली व खुद्द पुलकेशीसही मारले. पुढे तेरा वर्षेपावेतों चालक्याचे अमलास खंड पडला, व दक्षिण हिंदुस्थानांत पल्लवांचे प्राबल्य झाले. इ. स. ६५५ त पुलकेशीचा मुलगा विक्रमादित्य याने चालक्यांच्या घराण्याचा पुनः उत्कर्ष केला व पल्लव राजाचा पराभव करून त्याची राजधानी कांची घेतली. चालुक्यांचे व पल्लवांचें युद्ध सारखें चालूच होते. विक्रमादित्याचे कारकीर्दीत चालक्याची एक शाखा गुजराथेंत जाऊन राहिली. पुढील शतकांत आरब लोकांचे हल्लयास या शाखेने जोराचा प्रतिकार केला. ____ इ. स. ७५० चे सुमारास राष्ट्रकूट वंशापैकी दंतिदुर्ग नांवाच्या सेनापतीने चालुक्य राजा दुसरा कीर्तिवर्मा याचा पराभव केला. तेव्हांपासून चालुक्याच्या मुख्य शाखेचा अंत होऊन दक्षिण हिंदस्थानचे स्वामित्व राष्ट्रकूट वंशाकडे गेले, ते त्याचेकडे सुमारें २२५ वर्षे राहिले. ___ चालुक्य वंशाचे कारकीर्दीत बौद्ध धर्माचे वर्चस्व जरी नाहींसें झाले नव्हते, तरी जैन व हिंदुधर्म दिवसेंदिवस प्रबल होत चालले होते. मूर्तिपूजा व यज्ञयागादिकांचे महत्त्व वाढून विष्णु, शिव