Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___ त्याचे मुलगे कीर्तिवर्मा व मंगलेश यांनी पूर्व व पश्चिम दिशेस आपले राज्य वाढविले. कीर्तिवाने कोंकणांतील मौर्यांचा पराभव केला. मंगलेशाचे मृत्यूनंतर त्याच्या व कीर्तिवाच्या एका मुलाच्या दरम्यान गादीबद्दल तंटा पडला. शेवटी कीर्तिवाचे मुलास जय येऊन तो दुसरा पुलकेशी या नांवाने इ. स. ६०८ सालांत वातापीचे गादीवर बसला. तो वीस वर्षे आसपासच्या संस्थानांशी लढाया करण्यांत गुंतला होता. दक्षिण व उत्तर गुजराथ, व रजपुतस्थान, माळवा व कोंकण या प्रांतांपर्यंत त्याचे बाहुबळाचे वर्चस्व पसरले..... ___ पूर्वेस त्याने वेंगी शहर ( कृष्णा व गोदावरी नद्यांचे दरम्यान) घेतले, व आपला भाऊ कुब्ज विष्णुवर्धन यास प्रतिनिधि नेमलें. (इ. स. ६०९).. ___इ. स. ६.१५ चे सुमारास पुलकेशी हा कनोजचे हर्ष राजाशी लढाई करण्यांत गुंतला असतां, विष्णुवर्धनाने स्वतंत्र राज्य स्थापन केलें, व तेव्हां पूर्व चालुक्याचे वंशास आरंभ झाला. - चोल, पांड्य, केरल, व पल्लव या सर्वांच्या पुलकेशीशी लढाया झाल्या. इ. स. ६३० चे सुमारास पुलकेशी हा दक्षिणेत सर्वात प्रबळ राजा होता. . इ. स. ६२०. मध्ये पुलकेशीने उत्तर हिंदुस्तानातील हर्ष राजाचा पराभव केला. त्यामुळे नर्मदा नदी उत्तर व दक्षिण साम्राज्यांची मर्यादा झाली. - इ. स. ६२५ साली पुलकेशीने इराणचा राजा दुसरा खुत्रु याजकडे वकील पाठविला, व त्या राजानेही पुलकेशीकडे परत आपला वकील पाठविला. अजिंठ्याचे कोरीव लेण्यांत, पुलके. १ भाग पांच यांतील शेवटचे कलम पहा.. .