पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४५ व सरदार नसरतखान यांनी वाघेला यांचे राज्यावर स्वारी केली व त्यांचा पराभव करून त्यांची बायकापोरें, हत्ती, घोडे, वगैरे घेतले. कर्णदेव हा रामदेव यादव याजकडे पळून गेला. तेव्हां अन्हिलवाड्याचे राज्य नष्ट झाले. नसरतखान याचेजवळ मलिककाफूर नांवाचा गुलाम होता. तो पुढे दिल्लीचे सुलतानाचा मुख्य सेनापति झाला, व त्याने काठेवाड व गुजराथ हे प्रांत जिंकले. भाग १३ . महाराष्ट्र व तेलंगण देशांतील राज्ये. ___या दोन्ही देशांत सुमारे ४५० वर्षे आंध्र राजांचा अंमल होता. या राजांचे वर्णन मागे दिलेच आहे. ते राज्य सुमारे इ० स० २२५ सालपर्यंत चालले. त्यानंतर २०० वर्षांचा खात्रीलायक इतिहास मिळत नाही. परंतु महाराष्ट्रांत राष्ट्रकूट वंशाचे राजे राज्य करीत असावे असा अजमास आहे. हा वंश पुढे (व्या शतकाचे मध्याचे सुमारास दक्षिण हिंदुस्थानांत कांहीं काळपावेतों प्रबळ होता. या प्रांताचा राजकीय इतिहास चालुक्य वंशापासून म्हणजे सहावे शतकाचे मध्य भागापासून सुरू होतो. हे चालुक्यवंशीय राने उत्तरेकडील रजपूत लोकांपैकी होते. ___त्यांचा वंश पुलकेशी नांवाच्या राजाने स्थापन केला. सुमारे इ. स. ५५० साली त्याने वातापी (विजापुर जिल्ह्यांतील बदामी) शहर घेतले, व तेथें एक लहानसें संस्थान स्थापन केले. परंतु त्याची महत्त्वाकांक्षा मोठी होती म्हणून त्याने अश्वमेध यज्ञ केला.