________________
पराभव केला किंवा त्याच्याशी तह केला हे नक्की समजत नाही. परंतु एवढी गोष्ट खास आहे की, सिंहण आपल्या राज्यांत परत गेला. त्यानंतर मारवाडच्या राजांचा पराभव करून लवणप्रसाद स्तंभतीर्थ | खंबायत ] एथें आला. तेथील लोकांनी त्याचा मोठा सन्मान केला. इ. स. १२३२ चे सुमारास लवणप्रसादाने राज्यपद सोडलें व वीरधवल राज्यारूढ झाला. . वीरधवलाच्या पांच वर्षांच्या कारकीर्दीत त्याला तीन लढाया कराव्या लागल्या. त्यांपैकी दोहोंत त्याला जय मिळाला. पहिली लढाई जुनागडच्या जवळ वामनस्थळी ऊर्फ वनस्थळीचे राजे संगण व चामुंड यांच्याशी. ते त्याचे राणीचे बंधू होते. दुसरी लढाई कच्छांतील भद्रेश्वरच्या राजांशी. त्यांत त्याचा पराभव झाला. तिसरी लढाई दिल्लीचा सुलतान महमद घोरी याशी. त्यांत महमद घोरीचा पूर्ण पराभव झाला. वीरधवल इ. स. १२३८ त मरण पावला. तेव्हां त्याचे सेवकांपैकी १८२ नोकरांनी त्याचे बरोबर त्याचे चितेंत आपणांस जाळून घेतलें, आणखी पुष्कळ लोकही प्राण देणार होते, परंतु तेजपाळ प्रधानाने त्यांस मनाई केली. [ १२४३-- १२६१ ] वीरधवलानंतर त्याचा वडील मुलगा विशाळदेव गादीवर बसला. विशाळदेवानंतर अर्जुनदेव [ १२६२–१२७४ ] शारंगदेव ( इ. स. १२७५–१२९६ ) व कर्णदेव [ (२९६-१३०४ । याप्रमाणे राजे झाले. कर्णदेवाला घेलो [ भोळा ] असें म्हणत असत. त्याचे कारकदिति अल्लाउद्दिन खिलजीचा भाऊ अलफखान १ प्रो. आबाजी विष्णु काथवटे यांनी छापलेली कीर्तिकौमुदी. २ जपानचा मिकाडो राजा मरण पावला त्या वेळेस त्याच्या एका नामांकित सरदाराने प्राण दिल्याचे वाचकांचे स्मरणांत असेलच.