पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पत्र्यावर बसविले. शेवटी त्याचे पहारेकऱ्याने त्याचा स्वतःचा खून केला. त्याचेनंतर त्याचा मुलगा दुसरा मूळराज व मूळराजानंतर दुसरा भीम असे राजे झाले. भीमापासून साळंकी वंश नष्ट झाला, व वाघेला राजे राज्य करूं लागले. कुमारपाळाने आपला मावस भाऊ आनक ऊर्फ अर्णराज यास व्याघ्रपल्ली ऊर्फ वाघेला [ वाघाची गुहा : नांवाचे खेडे दिले होते. त्यावरून या वंशास वाघेला हैं नांव पडले. आनकचा मुलगा लवणप्रसाद व लवणप्रसादाचा मुलगा वीरधवल हे जरी वस्तुतः राज्य करीत होते, तरी त्यांनी राजा हे पद धारण केले नव्हते. ते वीरधवलाचा मुलगा विशाळदेव याने धारण केले. लवणप्रसादाचा गुरु सोमेश्वर होता, सोमेश्वराने कीर्तिकौमुदी व वस्तपालचरित्र' नांवाचे ग्रंथ केले आहेत. वस्तुपाल व तेजपाल हे दोघे बंधु लवणप्रसाद व वीरधवल यांचे प्रधान होते. त्यांनीच अबू , गिरनार व शत्रुजय या पर्वतांवरील प्रसिद्ध जैन मंदिरे बांधली. अबूचे पहाडावरील मंदिरें शुद्ध संगमरवरी दगडांची आहेत. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. काम करणाऱ्या कारागिरांना दररोज ते दगडाचा जितका भुसा काढतील, त्याच्या भारंभार चांदी दररोजच्या मजुरीबद्दल देत असत. काम करतांना थंडीच्या दिवसांत त्यांना शेगडया व सायंकाळी त्यांना उत्तम प्रकारचे भोजन घालीत. या मंदिरांचे काम ताजमहालचे खालोखाल आहे असे तज्ञांचे मत आहे. लवणप्रसादाच्या राज्यांत त्याच्यावर देवगिरीचा यादव राजा सिंघण ऊर्फ सिंघण याने दक्षिणेकडून व मारवाडचे चार राजे यांनी उत्तरेकडून स्वाऱ्या केल्या. लवणप्रसाद व त्याचा मुलगा वीरधवल हे प्रथम सिंहणाशी लढाई करण्यास गेले. त्याचा त्यांनी