पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ रांतून मेवाडला घेऊन जाण्याचा घाट घातला. इकडे राजाला राणी पळून गेल्याचे समजले तेव्हां तो दोन हजार घोडेस्वार बरोबर घेऊन तिचा पाठलाग करण्यास निघाला. पाठलाग करतां करतां ईदरपासून पंधरा मैलांवर त्यांची गांठ पडली. राजकवीबरोबर दोनशे निवडक स्वार होते. त्याने राणीस सांगितले की, आपण धैर्य धरावें. आमच्यापैकी एक मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत आपल्यास भीति नाही व ईदरला पोंचल्यावर आपण सुरक्षित आहों. लढाई सुरू झाली. परंतु ऐन वेळी राणीचा धीर खचला व तिने आपल्या गाडीतच आत्महत्त्या केली. राजाचे लोक तिचे गाडीजवळ आले तेव्हा तिच्या दासी म्हणाल्या " आतां युद्ध कशाकरता करतां ? राणी गतप्राण झाली आहे." बिचारा कुमारपाळ हताश होऊन आपल्या राजधानीस परत आला. कुमारपाळाचे पदरी रामचंद्र व उदयचंद्र नांवाचे विद्वान् जैन पंडित होते. परंतु त्याचा मुख्य पंडित हेमचंद्र हा होता. त्याच्या सहवासाने त्याच्यावर जैन मताचा इतका पगडा बसला की, त्याने दारू पिणे, मांस खाणे व शिकार करणे, हे सोडून दिले व आपल्या राज्यांत हिंसा बंद केली व कोळी, फांसेपारधी, व शिकारी यांचे परवाने काढून घेतले. हेमचंद्राचे । हैमीनाममाला' (अनेकार्थमाला , ' द्वयाश्रय काव्य' । अध्यात्मोनिषद' इत्यादि ग्रंथ आहेत. कुमारपाळ इ. स. ११७४ मध्ये मरण पावला. त्याचेनंतर त्याचा भाऊ महीपाळ याचा मुलगा अजयपाळ हा गादीवर बसला. हा राजा फार क्रूर होता. त्याने जैन मंदिरें पाडून टाकली. आपला ब्राह्मण प्रधान कपर्दी यास तापलेल्या तेलाच्या कढईत टाकून दिले; आणि जैन पंडित रामचंद्र यास तांब्याचे तापविलेल्या