________________
लपवून ठेविले. यामुळे तो वाचला. तेथून कुमारपाळ बडोद्यास (वटपद्रपुर ) आला व तेथून भडोचेस आला. तेथेही त्यास तूं राजा होशील असे भविष्य एका ज्योतिषाने सांगितले. नंतर कुमारपाळ उज्जनी, कोल्हापुर, कांची, कालंबपट्टण (कोलम ऊर्फ क्विलोन ) वगैरे ठिकाणी जाऊन शेवटीं अनहिलवाड्यास परत आला व सिद्धराजाचे मरणानंतर मंत्रिमंडळाने त्यास गादीवर बसविलें. (इ. स. ११४३ ). कुमारपाळाने सांभरचा राजा अर्णराज व माळव्याचा राजा बल्लाळ व कोंकणचा राजा मल्लिकार्जुन यांच्याशी लढाया करून त्यांचा पराभव केला. कुमारपाळाचे राज्याचा विस्तार उत्तरेस तुर्कीच्या राज्यापावेतों, पूर्वेस गंगानदीपर्यंत, दक्षिणेस विंध्याद्रीपर्यंत. व पश्चिमेस सिंधुनदीपावेतों होता. त्याने सोमनाथाचे नवे दगडी देवालय बांधिलें. हल्ली त्याचे गाभाऱ्यांत मशीद आहे. कुमारपाळाचें मेवाडचे राजाचे मुलीशी लग्न होण्याचे ठरले तेव्हा तिला असे समजले की, राजवाड्यांत प्रवेश होण्यापूर्वी राणीने हेमाचार्याचे मठीत जैन विद्या शिकण्यास राहावे लागते. ही गोष्ट करण्याचे तिने नाकबूल केले तेव्हां कुमारपाळाच्या राजकवीने तिला वचन दिले की, तुला हेमाचार्याच्या मठीत जावे लागणार नाही. राजवाड्यांत काही दिवस राहिल्यानंतर हेमाचार्याने राजास विचारले की, मेवाड घराण्यांतील तुझी राणी आमचे मठीत कां आली नाही ? तेव्हां राजाने तिला मठीत जाण्यास सांगितले. राणीने ती गोष्ट नाकबूल केली व ती आजारी झाली. राजकवीच्या स्त्रिया तिच्या समाचारास आल्या तेव्हां तिने ही गोष्ट त्यांना कळविली. त्या स्त्रियांनी राणीला आपल्या घरच्या स्त्रीचा पोषाख घालून आपले घरी आणली. राजकवीने तिला एका तळघ