पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४०. मोक्ष मिळणे अशक्य आहे, व जैनांनी वस्त्र परिधान करणे हे अशास्त्र आहे. वादांत शेवटी भट्टारक सूरीचा जय झाला. हेमाचार्य ऊर्फ हेमचंद्र हा सिद्धराजाचा आश्रित होता. _ सिद्धराजास मुलगा नव्हता. त्याचे राज्याला वारस कुमारपाळ नांवाचा दूरचा नातलग होता. तो पहिल्या भीमदेवाचा पणतू त्रिभुवनपाळ याचा मुलगा होता. हा त्रिभुवनपाळ दहि. थळीचा राजा होता. सिद्धराजाला कुमारपाळ गादीवर बसणे ही गोष्ट पसंत नव्हती, म्हणून त्याने त्रिभुवनपाळाचे सर्व कुटुंब ठार मारण्याचा हुकूम केला. त्रिभुवनपाळ ठार झाला, परंतु कुमारपाळ निसटून पळाला. बैराग्याचे सोंग घेऊन बरेच दिवस तो पळत होता. राजाच्या कानावर ही गोष्ट आली तेव्हां त्याला पकडण्याकरितां सर्व बैराग्यांना एक दिवस भोजनास बोलाविण्याचा त्याने घाट घातला. कुमारपाळ जेवणास गेला, परंतु राजानें आपल्याला ओळखिलें अशी त्याला शंका आल्याबरोबर तो तेथून निसटला. राजाने त्याचा पाठलाग करण्याकरितां लोक पाठविले, तेव्हां कांहीं कुणब्यांना त्याची दया येऊन त्याला त्यांनी झाडझाडोऱ्यांत लपविले, त्यामुळे तो वांचला. पुढे त्याने आपल्या जटा काढिल्या. काही दिवसांनी तो फिरत असतां त्याला देवस्त्री नांवाची स्त्री भेटली. तिने काही दिवस त्याचा सांभाळ केला. पुढे हेमाचार्याची व त्याची गांठ पडली. हेमाचार्याने त्यास तूं राजा होशील, असें भविष्य सांगितले. एक दिवस राजाचा प्रधान उदयन हा हेमाचार्याकडे आला तेव्हां कुमारपाळाची व त्याची भेट झाली. त्याने त्यास गुप्त रीतीने मदत करण्याचे कबूल केले. राजाला ही खबर लागली तेव्हां कुमारपाळास पकडण्यास राजाने फौज पाठविली. राजाचे लोकांनी हेमाचार्याच्या घराची झडती घेतली. हेमाचार्याने त्यास पोथ्या व ताडपत्रे यांत