पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३९ यात्रेकरूंना दर्शन झाल्याशिवाय परत जावे लागते. राजमातेला हे ऐकून फार वाईट वाटले व ती तेथून तशीच परतली. सिद्धराजाची गांठ पडली तेव्हां यात्रा झाल्याशिवाय परत येण्याचे कारण तिने त्यास सांगितले व हा कर माफ झाला नाही, तर मी अन्नपाणी घेणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. कराचे उत्पन्न सुमारें ७२ लाख होते. एवढी मोठी रकम सोडून देणे म्हणजे राज्याचे फार नुकसान होणार असें मंत्र्यांनी सांगितले, परंतु शेवटी राजाने तो कर सोडून मातोश्रीच्या हाताने मंदिरांत उदक सोडविले तेव्हां राजमातेनें यात्रा पुरी केली व देवास पुष्कळ मौल्यवान देणग्या दिल्या. सिद्धराज हा जसा मोठा धार्मिक व उदार राजा होता तसाच तो पराक्रमीही होता. राजाधिराज, महाभट्टारक, जयसिंहदेव, त्रिजगत्पति अशी त्यांची नामाभिधाने होती. त्याला मंत्रविद्या साध्य होती अशी लोकांची समजूत असे. त्याने गिरनारचा राजा खेंगार याचा पराभव केला, व त्याचे सोरट राज्य घेतले. तेथे त्याने सज्जन नांवाचा आपला प्रतिनिधि नेमला. त्या प्रतिनिधीने तीन वर्षांचा वसूल खर्ची घालून नेमिनाथाचे एक मोठे मंदिर बांधले. सिद्धराजाची दुसरी लढाई माळव्याचे राजाशी झाली, ती बारा वर्षे चालली. शेवटी तेथील राजा यशोवर्मा यास सिद्धराजानें पकडून आणिले. यानंतर त्याने बुंदेलखंडांतील महोबाचा चंडेल राजा मदनवर्मा याजवर स्वारी केली व त्याजकडून खंडणी घेऊन त्याचे राज्य त्याजकडेसच ठेविलें. सिद्धराजाने अनहिलवाडा पाटण येथे सहस्रलिंग नांवाचा मोठा तलाव बांधला व सिद्धपुरास रुद्रमहालय नांवाचे मंदिर बांधले. भोजराजाप्रमाणेच सिद्धराजाही विद्वान् लोकांचा मोठा आश्रयदाता होता. त्याचे समक्ष श्वेतावर जैन आचार्य भट्टारक देवसूरी व दिगांबर जैन आचार्य कुमुदचंद्र यांचा वाद झाला. कुमुदचंद्राचे म्हणणे, स्त्रियांना