Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गेला त्या हत्तीवर राजकन्या बसली होती. राजाला ती आवडली नाहीं, व त्याने तिला वरण्याचे नाकारिलें. राजकन्येला ती गोष्ट कळतांच आपल्या आठ दासींसह प्राणत्याग करण्याचा तिनं निश्चय केला. राजाच्या आईच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हां तिने या राजकन्येशी तूं लग्न केलेच पाहिजे असा आग्रह धरिला. शेवटी या गोष्टीस राजा कबूल झाला. परंतु काही दिवसांनी राजाचें मन एका वेश्येवर बसले. त्यामुळे राणी फार कष्टी झाली व या गोष्टीस काय उपाय करावा या विवंचनेंत पडली. राजाचे प्रधानांनी राणीला युक्ति सांगितली की, आपण त्या वेश्येचे सोंग व्या व तिचे ठिकाणी जाऊन बसावें. राणीला ही गोष्ट पसंत पडून त्याप्रमाणे तिने वर्तन केले. राजा तिच्या पाशांत पडला. तिनै राजाजवळून खुणेची मुद्रिका मागून घेतली. योग्य कालानंतर तिला मुलगा झाला. तोच पुढे प्रसिद्ध सिद्धराज झाला. कर्णास लढाई करण्याचा प्रसंग फक्त एक वेळेसच आला; तो आशा नांवाचे भिल्लाशी. हा सहा लाख मिल्लांचा मुख्य होता. त्याचा कर्णाने पराभव केला. सिद्धराज तीन वर्षांचा असतांना एके दिवशी सिंहासनावर जाऊन बसला. राजाला ही गोष्ट अपशकुनाची वाटली, व त्याने आपल्या मंत्र्यास व ज्योतिष्यांस विचारून सिद्धराजास तेव्हांपासून युवराज केलें. कर्ण इ. स. १०९४ मध्ये मरण पावला. तेव्हां त्याचा मुलगा सिद्धराज लहान असल्या कारणाने राज्यकारभार जगदेव नांवाच्या सेनापतीच्या हातांत ठेविला. सिद्धराजाची आई एक वेळ सोमनाथाच्या यात्रेस निघाली. वाटेत पुष्कळ यात्रेकरू, दुःखी व कष्टी असल्याचे तिच्या नजरेस पडले. तिने त्यांस दुःखाचे कारण विचारतां तिला असे समजले की, यात्रेकरूंना जबर कर द्यावा लागतो. तो देण्याची ऐपत नसल्या कारणाने पुष्कळ