Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फार जड झाले होते. हजारों लोक सारा माफ करावा म्हणून राजास विनंति करीत होते. राजपुत्राने या कुणब्यांचा सारा माफ करावा, एवढीच मला देणगी द्यावी असे सांगितले. राजाने ती विनंति मान्य केली. किरसान लोक [ कुणबी लोक ] खुष होऊन आपापले घरी परत गेले. यानंतर तीन दिवसांतच राजपुत्र एकाएकी मरण पावला. त्यामुळे प्रजाजनांस फार दुःख झाले. पुढचे साली शेताचे पीक दुप्पट आले. तेव्हां कुणबी लोक आपण होऊन दोन्ही सालचा सारा आमचेकडून घ्यावा असे म्हणू लागले. माझे मुलाचे सांगण्यावरून मागील सालचा सारा माफ केला आहे, तेव्हां मी तो घेणार नाही, असें राजाने निक्षून सांगितले. कुणबी लोक ऐकेनात. शेवटी त्याने पंच नेमिले व पंच सांगतील त्याप्रमाणे करावें असे ठरले. पंचांनी दोन्ही सालचा सारा घेऊन त्यांतून महादेवाचे मोठे मंदिर बांधावें, असें ठरविले व त्रिपुरुषप्रासाद नांवाचें नवें मंदिर बांधले. पुढे भीम राजाने आपला मुलगा कर्ण यास गादीवर बसविलें, व आपण वानप्रस्थ आश्रम धारण करून मुंडकेश्वर क्षेत्री जाऊन राहिला. कर्णराजाने । कर्णमेरु ' नांवाचे देवालय व · कर्णसागर ' नांवाचा तलाव बांधला. तसेंच कर्णावती शहर बसवून तेथें कर्णेश्वर नांवाचे महादेवाचे देवालय बांधले. हेच कर्णावती शहर पुढे अमदाबाद झाले. कर्णाच्या लग्नाची हकीकत चमत्कारिक आहे. ती अशी:-एके दिवशी राजाकडे एक फिरस्ता चित्रकार आला, व त्याने राजास सांगितले की, दक्षिणेतील कदंब राजा जयकेशी याची कन्या उपवर आहे; तिने आपली कीर्ति ऐकून आपणांशी लग्न करण्याचा निश्चय केला आहे व आपल्यास भेटीदाखल एक हत्ती पाठविला आहे. राजा हत्ती पाहावयास १ पाहेले मूळराजाने या नांवाचे मंदिर बांधलें म्हणून जे काही ग्रंथ कारांनी लिहिले आहे ते चुकीचे आहे.