पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ मूळराज हा गादीवर बसला. ब्रह्मदेवाचे तळहाताचे खोलग्यापासून [चुलुक ] या वंशाची उत्पत्ति झाली अशी दंतकथा आहे, यावरून या वंशास चौलुक्य असें नांव पडले. मूळराजाचा जन्म मूळ नक्षत्रावर झाल्या कारणाने त्याचे नांव मूळराज असें ठेविले. मूळराजा उदरांत असतांना त्याची आई लीलादेवी ही मृत्यु पावली व नंतर मूळराजास उदरांतून काढून घेतले मूळराजा मोठा पराक्रमी होता.त्याने काठेवाड, कच्छ, लाट हे प्रांत जिंकले, व अजमीरचे विग्रहराजाचा पराभव केला. त्याने अनहिलवाड्यास 'त्रिपुरुषप्रासाद' नांवाचें व सिद्धपुरास · रुद्रमहालय ' नांवाचे अशी भव्य मंदिर बांधली. मुळराजाने ब्राह्मणांस पुष्कळ दानधर्म केला. औदिच, श्रीगौड, व कनोज ब्राह्मणांस त्याने कुरुक्षेत्र, बंगाल व कान्यकुब्ज येथून बोलावून आणले. त्याचे मरणानंतर चामुंड हा गादीवर बसला [ ९९७ ]. त्यानंतर त्याचा मुलगा वल्लभ व पुढे दुर्लभ असे राजे झाले. दुर्लभाने अनहिलवाडा येथे दुर्लभ सरोवर नांवाचा तलाव बांधिला. त्याचा पुतण्या भीम याचे कारकीर्दीत महंमदानें सोमनाथावर स्वारी केली. भीमाने सिंघच्या व चेदीच्या राजांचा पराभव केला, परंतु भोजराजाचा सेनापति कुलचंद्र याने भीमाचा पराभव केला, व त्याचे राजधानीच्या वेशीत कवड्या पेरल्या; हेतु हा की, अन्हिलवाड्याची किंमत कवडीइतकी आहे हे दाखवावें, भीमाचा सेनापति विमल याने अबूचे पहाडावरील परमार राजाचा पराभव करून तेथें विमलवस्ती नांवाचे जैन मंदीर बांधले. [१ ०२४]. भीमाचा मुलगा दुसरा मुळराज होता. मुळराजाचे आपलें मुलावर फार प्रेम होते. तो मुलगा घोड्यावर बसण्यांत फार निपुण होता. एके दिवशी राजा त्या मुलावर फार खुष होऊन त्याने त्यास कांहीं बक्षीस मागण्यास सांगितले. त्या साली राज्यांत मोठा दुष्काळ पडला होता; कुणब्यांना जमिनीचा सारा देण्यास