Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

योगराज राज्य करीत असतांना त्याचा मुलगा क्षेमराज याने त्यास सांगितले की, प्रभास ऊर्फ सोमनाथ येथे पुष्कळ फिरस्ती जहाजे अडकून पडली आहेत त्या जहाजांवर पुष्कळ द्रव्य व जवाहीर वगैरे मौल्यवान माल असून दहा हजार घोडे वः हत्तीही आहेत. तरी ती जहाजे आपल्या हस्तगत करून घ्यावीत. राजाला ती गोष्ट पसंत पडली नाही व त्याने आपल्या मुलास तसे करण्यास निषेध केला. परंतु राजपुत्रांनी राजाज्ञा अमान्य करून ती जहाजें पकडली. ही गोष्ट सेवकांनी राजाच्या कानावर घातली, तेव्हां राजा काही न बोलतां स्तब्ध राहिला. सेवकांनी राजास आपण कांहींच आज्ञा देत नाही, तेव्हां काय समजावें म्हणून प्रश्न केला, तेव्हां राजा म्हणाला “ ही गोष्ट मी मान्य केल्यास मला पाप लागेल व अमान्य केल्यास तुम्हांम पसंत पडणार नाही. आमचे पूर्वजांस लुटारू म्हणून आजपर्यंत लोक शिव्याशाप देत आले. अलीकडे आमचे आचरण शुद्ध झाल्या करणाने आमच्यावरील आरोप नाहीसा होत आला होता. आतां ह्या कृत्याने आमच्या नांवास पुनः बट्टा लागणार. तेव्हां आतां देह न ठेवणे हेच बरे." असे म्हणून राजाने अग्निकाष्ठं भक्षण केली. चावडा वंशानंतर अन्हिलवाड्याचे राज्य चौलुक्य ऊर्फ सोळंकी वंशाकडे गेलें. चौलुक्य ऊर्फ सोळंकी वंश. या वंशाची हकीकत हेमचंद्राचे व्याश्रय काव्यांत सिद्धराजापर्यंत [ ११४३ ] पूर्णपणे दिली आहे. हेमचंद्राने या ग्रंथास इ. स. ११६० साली आरंभ केला. तो त्याचे मरणानंतर आभ्यतिलकगणी नांवाचे जैन साधूनें १२९५ साली पुरा केला. चावडा वंशांतील शेवटचे राजाचे मृत्यूनंतर त्याचे मुलीचा मुलगा