Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४. होती; व ज्या घरांत आपण जेवतों, तें घर आपल्या स्नेहाचे अशी दृढ समजूत गुजराथेत फार प्राचीन काळापासून असल्याने वनराजाने त्या घरांतील कोणत्याही मालास हात लाविला नाही. ही गोष्ट त्या घराची मालकीण श्रीदेवी हिला समजली. त्यावरून तिने वनराजास आपले घरी जेवण्यास बोलाविलें. वनराजाने ती गोष्ट कबूल केली व तिला वचन दिले की, तूं माझी बहीण झाली आहेस, तेव्हां माझा राज्याभिषेक तुझ्याहातून मी करून घेईन. त्याप्रमाणे वनराजाचा राज्याभिषेक श्रीदेवीचे हाताने झाला. चावडा घराण्याचे राज्य एकंदर १९६ वर्षे चाललें, त्यांची शकावली येणेप्रमाणे: वनराज (७६५-७८०) योगराज (८०६-८४१) रत्नादित्य वैरसिंह क्षेमराज चामुंड . घाघड' नांव माहीत नाही जान ९३७-९६१