पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३३ नंतर रूपसुंदरी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. अरण्यांत जन्म झाल्यामुळे त्या मुलाचे नांव वनराज असें ठेविलें. (इ. स. ७२०) तो आपल्या मामाजवळ राहिला. एका कान्यकुब्ज राजाने एका गुजराथचे राजाचे मुलीशी लग्न केले. त्या गुजराथच्या राजाने वरदक्षिणा देण्याकरितां आपल्या प्रजेवर कर बसविला. ती रकम वसूल करण्याकरिता कान्यकुब्ज राजाकडून जे अधिकारी आले. त्यांनी वनराजास आपला प्रमुख म्हणून नेमले. वनराजाने चोवीस लाख द्राम नाणी व चार हजार घोडे जमा केले. हे द्रव्य व घोडे राजाचे अधिकारी राजाकडे घेऊन जाण्यास निघाले. वाटेत वनराजाने त्यांच्यावर हल्ला केला, व तें द्रव्य व घोडे त्याने आपल्या स्वाधीन करून घेतले आणि तो एक वर्ष लपूनछपून राहिला. त्या मुदतींत त्याने बरीच फौज जमविली व राजा हैं पद धारण केलें; व अनहिलवाडा हे शहर आपली राजधानी केली. हे नांव पडण्याचे कारण असे झाले की, वनराज आपल्या राजधानीकरितां जागा शोधीत असतां अनहिल नांवाचे धनगरास त्याने विचारले. तो म्हणाला, तुमचे राजधानीस माझें नांव द्याल तर मी उत्तम शकुनाची यशस्वी जागा तुम्हांस दाखवीन. वनराजाने ती गोष्ट मान्य केली आणि ते दोघे हिंडत हिंडत गेले तो त्यांनी एके ठिकाणी सशाचे मागें शिकारी कुत्रे लागले असतां, तो ससा कुत्र्याच्या आंगावर धावून गेला असा चमत्कार पाहिला. यावरून ही जागा शौर्याची व यशस्वी आहे असे समजून वनराजाने तेथे आपली राजधानी स्थापन केली. राज्यप्राप्त होण्याचे पूर्वी एका प्रसंगी वनराज कांहीं माथीदार बरोबर घेऊन एका गांवीं दरवडा घालण्याकरितां गेला होता. त्या गांवांतील एका घरांत तो शिरला तेव्हां त्याचा हात एका दह्याचे हंडीत पडला. दही खाणे हे जेवण्याप्रमाणेच आहे, अशी समजूत