पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ या काळांत पुनः दक्षिणेतील राष्ट्रकूट राजांची प्रत्यक्ष सत्ता गुजराथेवर होती. ९७२ वर्षाचे सुमारास पश्चिमेकडील चालुक्य राजा तैलप याने इंद्र ऊर्फ नित्यवर्ष रट्टकंदर्प याचा पराभव केला व राष्ट्रकूट वंश समाप्त झाला. मैत्रिक ऊर्फ मिहीर ऊर्फ मेर लोकांनी गुप्त अंमलाचा हास होण्याचे सुमारास आपला अमल काठेवाडांत बसविला. पोरबंदरचे राजे त्या लोकांचेच वंशज आहेत. आम्ही मकरध्वजाचे वंशज आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. मेर कुळाचे निशाणांत मकराचे चित्र होते, यावरून त्यांच्या म्हणण्यास काही आधार आहे असे दिसते मालव, जाट, गुजर व पल्लव जातींप्रमाणे हे मेर लोकही परदेशांतून आले असावेत. - अनहिलवाड्याचे राज्य ( इ. स. ७२०-१३००). - या वेळेपर्यंतचा इतिहास ताम्रपट, नाणी इत्यादि गोष्टींवरून अदमासाने लिहिलेला आहे. अर्थात् तो अपूर्ण व अनिश्चित आहे. परंतु इ. स. ७२० नंतरचा इतिहास बराच खात्रीलायक आहे. तथापि चावडा वंशाचे आरंभीचे इतिहासाची माहिती पूर्ण खात्रीलायक मिळत नाही. या इतिहासास आधारभूत ग्रंथ म्हणजे मुख्यत्वेकरून हेमचंद्राचे व्याश्रयकाव्य,मेरुतुंगाचें प्रबंध चिंतामणिकाव्य, त्याचाच विचारश्रेणि ग्रंथ, कृष्णभटाची रत्नमाला, सोमेश्वराची कार्तिकौमुदी, व अरिसिंहाचें सुकृतसंकीर्तन. हे होत. आरंभी गुजराथ व कच्छ यांचे दरम्यान पंचासर नांवाचे एक गांव होते. तेथे चावडा नांवाचे एक लहानसें राज्य होते. इ. स. ६९६ मध्ये चालुक्य राजा भुवड याने चावडा राजा जयशेखर याजवर स्वारी करून त्याचा पराभव केला. त्या वेळेस जयशेखराची स्त्री रूपसंदरी ही गर्भवती होती. तिला त्याने तिचा भाऊ सूरपाळ याचे बरोबर अरण्यांत पाठवून दिले. जयशेखराच्या मृत्यू