Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० राष्ट्रकुट लोक मूळ कोठून आले, हे समजत नाही. त्यांचा मूळ राजा अभिमन्यु नांवाचा होता. (इ. स. ४६० ). त्यांची राजधानी मान्यखेत अथवा मान्यखेट ( मालखेड ) ही होती. हे गांव सोलापुराचे अग्नेय दिशेस साठ मैलांवर दूर आहे. राष्ट्रकूटांच्या गुजराथेतील सत्तेस आरंभ दंतिदुर्गापासून झाला. त्या राजानें गुरजर राजा जयभट याचा पराभव करून लाट प्रांत घेतला. या वंशांतील ध्रुवराजा बलिष्ठ होता. त्याचे राज्य दक्षिण हिंदुस्थानापासून अलाहाबादपावेतों होतं. त्याने आपला मुलगा गोंविंद यास गुजराथेचे स्वतंत्र राज्य दिले. (इ. स. ८४० ). गोविंदाने ते आपला भाऊ इंद्र यांस दिले. राष्ट्रकुटांचे गुजराथेतील सत्तेचे तीन विभाग करता येतील. पाहला काळ इ. सः ७४३ पासून ८०८ पावेतों ६३ वर्षांचा. या मुदतीत गुजराथेतील राष्ट्रकूट राजे दक्षिणेतील मुख्य राष्ट्रकूटवंशाचे सत्ताधीन होते. दुसरा काळ ८०८ पासन ८८८ पावेतो ८० वर्षांचा. त्या काळांत गुजराथेतील राष्ट्र१९ ग्रामकूट- ग्रामाधिकारी. राज्याचे मुख्य भाग चार होते (१) विषय; (२) आहार ऊर्फ आहरणी; (३) पथक; (४) स्थळी. खेडा प्रांत व काठेवाड प्रांत यांतील जमिनीचा सारा वसूल करण्याच्या पद्धति भिन्न भिन्न होत्या. खेडा प्रांतांत जमिनीच्या उत्पन्नावर कर घेत असत. दरएक पिटक अथवा टोपलीप्रमाणे कर ठरविण्यांत येई. काठेवाडांत जमिनीच्या विस्तारावर कर ठरविण्यात येत असे. पादावर्त म्हणजे दोन पावलांमधील अंतरावरून जमीन मोजण्यांत येई. चालुक्यांनी कोणाचा पराभव करून गुजराथचे राज्य मिळविलें हैं नक्की समजत नाही. परंतु बहुधा गुर्जर राजांचा त्यांनी पराभव केला असावा. चालुक्यांची वंशावळ येणेप्रमाणे आहे. पुलकेशी सत्याश्रय इ. स. ६१०-६४० (पान १३१ पहा.)