________________
१२९ जयसिंहवर्मा चालक्याने प्रथम आपला अमल बसविला. इ. स. ७४० चे सुमारास राष्ट्रकूटांनी चालुक्यांचा पराभव करून त्यांचे राज्य घेतले. गुर्जर राजांचे राज्य इ. स. ५८० पासून ८०८ पावेतों होते. या वंशांत सहावा राजा तिसरा जयभट नांवाचा होता. त्याचे वेळेपर्यंत मात्र त्यांचा अमल जारी होता. त्यानंतर या वंशाचा अमल केवळ नांवाचा होता. करणारे सांप्रतचे तलाठी अगर कुळकर्णी. रयतेकडून सरकारचे अधिकारी अयोग्य रीतीने वसूल करतात की काय हे पाहण्याचे त्यांचे काम होते. कच्छ प्रांतांत कुळकर्त्यांना अद्याप धू व ध्रुव म्हणतात. नागर ब्राह्मणांत व मोध व इतर वाण्यांत धू हे उपनांव आहे. ७ आधिकरणिक-मुख्य न्यायाधीश. ८ दंडपाशिक-मुख्य पोलीस अधिकारी अथवा अपराध्यांचा वध करणारा. ९ चौराद्धरणिक-चोर पकडणारा. १० राजस्थानीय-परराष्ट्रासंबंधी व्यवहार करणारा. ११ अमात्य-प्रधान अथवा मंत्री. १२ अनुत्पन्नादान समुग्राहक--थकलेले सरकारी कर वसूल करणारा. १३ शौत्मिक-- जकातीचा अमलदार. १४ भोगिक ऊर्फ भोगोद्धरणिक--जमिनीचे उत्पन्नाचा राजाचा सहावा भाग वसूल करणारा. काठेवाडांत मालकाला कुळे जो उत्पन्नाचा भाग देतात त्याला भोग असे म्हणतात. १५ वर्त्मपाळ- रहदारीचे रस्त्यांचा चौकीदार. १६ प्रतिसरक--शेतांचे व गांवाचे रात्रीचे पहारा करणारे. १७ विषयपति--सुभेदार. १८ राष्ट्रपति--प्रांताचा अधिकारी. (पान १३० पहा.)