Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ (४६४-४७०); यांचे राज्य गुजराथ व काठेवाडांत होते.' गुप्तांचे नंतर काठेवाडांत वल्लभी राजे झाले. त्यांची राजधानी हल्लीचे वळे नांवचे गांव आहे, तेथे होती. हिउएन त्संग हा या राजाचे कारकीर्दीतच या प्रांतावर आला होता. त्याचे वेळेस या राज्याचा विस्तार १०० मैल होता, व राजधानीचा विस्तार ५ मैल होता. या राज्यांत ६००० साधू होते व माळव्याचे शिलादित्याचा पुतण्या ध्रुवपटु नांवाचा राजा गादीवर होता. या राजाचा धर्म शैव होता. यांचा मूळ पुरुष भटार्क नांवाचा गुर्जर होता. या वंशांत एकंदर १९ राजे झाले. त्यांत शिलादित्य नांवाचे सात राजे झाले. शेवटी अरब लोकांनी हल्ला करून राजधानी लुटली, व राजास ठार मारिले व या वंशाची समाप्ति झाली. यानंतर दक्षिणेतील चालुक्य राजांचा अमल येथे बसला.' १ मि. विन्सेन्ट स्मिथने दिलेली वर्षे येणेप्रमाणे आहेत; व तीच आतां खरी मानावींत असे मत आहेः-चंद्रगुप्त ३२०–३२६; समुद्रगुप्त ३२६-३७५; दुसरा चंद्रगुप्त ३७५-४१३; कुमारगुप्त ४१३-४५५; स्कंधगुप्त ४५५-४८०; २ वल्लभी ताम्रपटावरून त्या वेळच्या ग्रामसंस्थांच्या व वसूल करण्याच्या खात्याच्या अधिकाऱ्यांची वगैरे नांवें समजतात ती अशी आहेतः१ आयुक्तक । २ विनियुक्तक) नमलला अधिकारी, ३ द्रांगिक-शहराचा (द्रांग ) अधिकारी. ४ महत्तर-गांवांतील मुख्य अधिकारी; मराठी शब्द म्हातारा या शब्दापासूनच निघाला आहे. ५ चाटफट-चाट ( लबाड ) लोक पकडण्याकरितां नेमलेले भट (शिपाई ); सांप्रतचे पोलीस. ६ ध्रुव-कायमचे वंशपरंपरेने गांवच्या हिशेबाचे व दप्तराचे काम .. (पान १२९ पहा.) .