________________
१२७ ळील सुदर्शन तलावाची दुरुस्ती झाली. त्याला महाक्षत्रप म्हणत असत. त्याने यौधेय नांवाचे शूर जातीचे लोकांचा व दक्षिणेकडील शातकर्णी राजाचा पराभव केला. यानंतर पुढे बरेच क्षत्रप राजे झाले. एकंदर २७ क्षत्रप राजे झाले. ___क्षत्रपानंतर त्रैकूटकांचे राज्य झाले. हे आभार जातीचे लोक होते. त्यांचा मूळपुरुष ईश्वरदत्त नांवाचा होता. ज्याप्रमाणे पल्लवांचे म्हणणे आम्ही भारद्वाज ऋषीचे वंशज आहों, गुर्जरांचे म्हणणे आम्ही महाभारतांतील कर्णवीराचे वंशज आहों, तसे आभारांचे म्हणणे आह्मी हैहयाचे वंशज आहोत. इ. स. ३०० चे समारास क्षत्रपांचा अमल कमजोर होऊन त्रैकूटकांचा वाढला. पांचवे शतकाचे मध्याचे सुमारास गुप्त वंशाने त्यांचा अमल नाहींसा केला. त्यांची सत्ता महाराष्ट्र व दक्षिण कोंकण प्रातांत होती. प्रसिद्ध चंद्रगुप्त, समुद्रगुप्त ( ३७०-३९५ ), दुसरा चंद्रगुप्त ( ३९५-४१५), कुमारगुप्त, (४१६-४५३), स्कंधगुप्त १ हाइहाय व नालजंग नांवाचे लोक परदेशांतून भरत खंडांत आल्याचे पुराणांतरी लिहिले आहे. हरिश्चंद्र राजाचे वंशजांपैकी बाहुक नांवाचे राजाचे कारकीर्दीत हाइहयांनी अयोध्या प्रांतावर स्वाऱ्या केल्या व त्या राजास राज्यांतून हाकलून लाविले. पुढे बाहकाचा मुलगासगर याने त्या लोकांना आपले राज्यांतून हाकून दिले. नहुष राजाचा ज्येष्ठ मुलगा सहस्रजित याचा मुलगा शतजित नांवाचा होता. त्याला हइहाय, वेणू ,व हय नांवाचे तिघे मुलगे होते. हइहयाचा पणतू महित नांवाचा होता. त्याने नर्मदातटाकी महिष्मति नांवाची नगरी स्थापन केली. सांप्रतचे चूलीमहेश्वर किंवा मानधाता शहर हेच ती नगरी असावी.( Dalall's History of India, vol. 1 पू. १०८)