पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ सालापर्यंतचा इतिहास समजत नाही. खि. पू. १८०-१०० पावेतों युक्रेटायडीज, मेन्यांडर, आपालाडोटस नांवाचे ब्याकट्रिअन ग्रीक राजे होते. रुद्रदामनाच्या गिरनार पर्वतावरील लेखावरून क्षत्रपांचे राज्य गुजराथेत असल्याचे स्पष्टपणे सिद्ध होते. (बाँबे गॅझेटिअर, भडोच व सुरतेचा भाग पृ. ४६४ ). तें खि. प. ७० ते इ. स. ३९८ पावेतों होते. त्यांची दोन घराणी होती; एक उत्तरेकडील व एक पश्चिमेकडील. उत्तरेकडील क्षत्रपांचे राज्य काबल'पासून गंगायमुनेच्या संगमापावेतों होतें. पश्चिमेकडील क्षत्रपांचे राज्य अजमीरपासून उत्तर कोंकणापावेतों व माळव्यापासून अरबी समुद्रापावेतों होतें. उत्तर क्षत्रपांचे राज्य माऊसाचे राज्यारोहणापासन (खि. पू. ७० ) ते कनिष्काचे राज्यारोहणापावेतों होतें. (इ० स० ७८ ). पश्चिम क्षत्रपांत पहिला क्षत्रप नहपान हा होता. तो कनिप्काचा सेनापति ह्मणून किंवा स्वतंत्र राजा म्हणून पूर्व रजपूतस्थानांतून पश्चिम माळव्याकडून दक्षिण गुजराथेत प्रांत जिंकीत आला. पढें त्याने आपला अमल काठेवाड व नाशीकपावतों बसविला. नहपानानंतर त्याचा जावई उषवदात हा गादीवर बसला. हा राजा फार उदार होता. व त्याने फार मोठे दानधर्म केले; ब्राह्मणांस लक्षावधि गाई त्याने दिल्या. अबूचे पहाडाजवळ वारनस नदीवर घाट बांधिला; ३२ हजार नारळाची झाडें चरक ब्राह्मणास दिली; पुष्कर तीर्थी एक गांव व तीन लक्ष गाई दिल्या. केळवें माहीम व डहाणू येथील ब्राह्मणांस झाडे व सुवर्ण दिले. पुष्कळ नद्यांवर उतारूंकरितां नावा ठेविल्या; तापीवर व कावेरीवर घाट बांधले. त्याचे नंतर चष्टन व जयदामा क्षत्रप झाले. चवथा क्षत्रप रुद्रदामा होता. [१४३–१५८]. त्याचे राज्यांत गिरनार जव