________________
यावरून रेवताचे राज्य जाऊन त्यास पळून जावे लागलेसें दिसते. तो परत आला तेव्हां यादवांची सत्ता पूर्णपणे स्थापित झाली होती. ___ यादवांचे कुळीच्या पुष्कळ शाखा झाल्या. त्यांचे कुळीचा मूळ पुरुष यदु होता.त्यांत वृष्णि, मधु,शातवत, शूरसेन वगैरे राजे झाले. शातंवत हा यदूपासून सदतिसावा वंशज होता. त्याचेच कुळींत देवकी व वसुदेव हे झाले. त्यांचा मुलगा श्रीकृष्ण होय. कृष्ण मथुरेस असतांना त्याजवर कालयवन व मगध देशांतील जरासंध यांनी स्वाऱ्या केल्या तेव्हां तो पळून सुराष्ट्राकडे आला. तिकडे एका गहेंत मुचकंद ऋषि तप करीत बसले होते. कालयवन कृष्णाचा पाठलाग करीत करीत त्या गुहेत शिरला, व कृष्ण समजून त्याने त्या ऋषीला लत्ताप्रहार केला. त्यावरून त्या ऋषींनी त्यास जाळून भस्म केले. राजसूययज्ञाकरितां कृष्ण हस्तिनापुरास गेले, तेव्हां शौभ देशांतील मृत्तिकावतीचा राजा शाल्व याने द्वारकेवर हल्ला केला. पुष्कळ लुटालूट करून द्वारकेचे सैन्य बरेच मारून तो निधन गेला. कृष्ण परत आल्यावर त्याने शाल्वावर स्वारी केली, व त्याचा पराभव केला. पुढे महाभारतांतील युद्धानंतर सुमारे ३६ वर्षांनी प्रभास ऊर्फ सोमनाथपट्टणाजवळ यादवांची आपसांत लढाई होऊन त्यांचा कुलक्षय झाला. यादवानंतरचा गुंजराथचा इतिहास कळण्यास पूर्ण साधने उपलब्ध नाहीत. मौर्य वंशांतील प्रसिद्ध अशोक राजाने धम्मरखितो नांवाचा यवन या प्रांतांत उपदेश करण्यास पाठविला. यावरून त्या प्रांतांत परदेशीय लोक असावेतसे दिसते. मौर्याचा अमल खि० पू. ३१९--१०० पर्यंत होता. त्यांची राजधानी गिरीनगर ऊर्फ गिरनार अथवा जुनागड ही होती. त्यांची दक्षिणेतील राजधानी सोपारा ही होती. शेवटचा मौर्य राजा संमति नांवाचा होता (खि पू. १९७ ). त्या सालापासून खि. पू. १८० बापरून त्या प्रांतांत