Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ते ६०० ), जाडेज व काठी लोक (इ. स. न. ७९०-९००), अफगाण, तुर्क, मोगल व उत्तरेकडील मुसलमान ( इ. स.१००० १५०० ), याप्रमाणे उत्तरेकडून लोक आले. वायव्येकडून आर्यन लोक आले. पूर्वेकडून लोक आले ते येणेप्रमाणे:_____ मौर्य ( खि. पू. ३०० ); निमसिथियन क्षत्रप खि. पू. १०० इ. स. ३००; गुप्त (इ. स. ३८०); गुर्जर (इ. स.४ ००-६००); मोगल(१९३०); मराठे (१७५०). दक्षिणेकडून लोक आले, ते येणें प्रमाणे:____ शातकर्णी (इ. स. १००);चालुक्य व राष्ट्रकूट ( इ. स.६५ ०९५०); मुसलमान लुटारू ( १५००-१६००); पोर्तुगीज ( १५०० ); मराठे ( १६६० ते १७६०); ब्रिटिश (१७८० ते १८२०) या प्रांतासंबंधाने पौराणिक कथा अशी आहे की, मनूचा नातू व शर्यातीचा मुलगा आनत हा पहिला राजा होय. त्याचा रेवत नांवाचा मुलगा होता. त्याची राजधानी कुशस्थळी ऊर्फ द्वारका ही होती. तो आनत देशावर राज्य करीत होता. त्याला शंभर मुलगे होते. त्यांपैकी रैवत ऊर्फ कुकुझी हा ज्येष्ठ होता. रेवताला रेवती नांवाची मुलगी होती. ती उपवर झाली तेव्हां रेवत ब्रह्मदेवाकडे गेला. तेव्हां ब्रह्मदेव गाणे ऐकण्यांत गर्क होऊन गेले होते. त्यामुळे रेवताला वाट पहात बसावे लागले. ब्रह्मदेव गायन आटपल्यानंतर बाहेर आले तेव्हां रेवताने त्यांस आपले मुलसि योग्य वर पाहण्याची विनंति केली. ब्रह्मदेवाने त्यास सांगितले की, तूं येथे वाट पाहात बसलास त्या काळांत तिकडे तुझें राज्य गेले . आतां तूं आपली मुलगी द्वारकेचा राजा बलदेव यास द्यावी. त्याप्रमाणे रेवताने बलदेवास आपली मुलगी दिली.