पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२३ अद्याप सोरठ असे म्हणतात. मही व तापी नद्यांचे दरम्यानच्या भागाला लाट हे नांव होते. हे नांव बहुधा रट नांवाचे लोकांची तेथे वस्ती असल्यामुळे पडले असावें. गुजराथ प्रांतांत बाहेरून लोक आले ते दोन मार्गानी आले;; जलमार्गाने व खुष्कीच्या मार्गानें. जलमार्गाने प्रथम खि. पू. १५००-५०० या एक हजार वर्षांत यादव आले. नि. पूर्वी ३००-इ. स. १०० वर्षेपावेतों ग्रीक, ब्याकट्रियन, पार्थियन, व सिथियन वगैरे यवन लोक आले. इ. स. ६००-८०० वर्षंपावेतो पारशी व त्यांचे पाटलाग करणारे आरब लोक आले.. इ. स. ९००-१२०० वर्षेपावेतों संगन नांवाचे चांचे लोक आले. पोर्तुगीज व तुर्क १५००-१६०० त; आरब व इराणी चांचे १६००-१७०० त; आफ्रिकन, अरब, इराणी व मक्राणी लटारू लोक १५००-१८०० पावेतों आले. अर्मिनियन, डच व फ्रेंच १६००-१७५० पर्यंत आले. ब्रिटिश लोकांनी इ. स. १६ १२ त सुरत येथे आपली वखार स्थापन केली. इ. स १६ १३ त आल्डवर्थ व विशिंग्टन नांवाचे दोन इंग्रज व्यापारी भडोच शहरी आले. इ. स. १६ १४ त त्यांनी वखार स्थापन कर-- ण्याकरतां एक घर भाड्याने घेतले. इ. स. १६१५ त सर टामस रो साहेबानें जहांगिर बादशहाची भडोच येथें वखार काढण्याची परवानगी मिळविली. इंग्रज व्यापाऱ्यांना सुभ्याचे वाड्याजवळ राहून प्यावे, व त्यांचेकडून जकात घेऊं नये, व त्यांना कोणी त्रास देऊं नये असे सदर फरमानांत लिहिले होते. भडोचचे वखारीच्या मुख्य मुनीमाने सुरतच्या मुख्य अधिकाऱ्याचे ताब्यांत राहावे व त्याला दरसाल ४०० रुपये पगार होता. ( मुंबई गॅझेटीअर, सुरत व भडोच जिल्ह्याचे पुस्तक पृ. ४६८ ) खुष्की मार्गाने उत्तरेकडून सिथिअन व हूण (खि. पू. २०९ इ. स.९००),गुर्जर ( इ.स.४००.