Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ कांहीं जातिसंबंध नाही. राष्ट्रकूट हे या देशांतील मूळच्या रहिवाशांपैकीच असावेत. ____ वर लिहिलेल्या उत्तरेच्या व दक्षिणेच्या रनपुतांमध्ये वरचेवर लढाया होत असत. यांचे मुळाशी हे कारण होते की, उत्तरेकडील रजपूत हे परदेशस्थ होते, व दक्षिणेकडील रजपूत हे या देशांतील मूळचे रहिवासी होते. गुजराथ. हिंदुस्थानच्या वायव्येकडून हिंदुस्थानांत जे हूण लोक आले त्यांपैकीं गुज्जर नांवाचे जे लोक होते ते प्रथम पंजाबांत येऊन राहिले आणि नंतर ते गुजराथकडे आले. तेव्हापासून या प्रांताचें नांव गुजरराठ (गुजराथ ) असे पडले. या प्रांताचे प्राचीन काळी आनते, सुराष्ट, ऊर्फ सौराष्ट व लाट असे तीन भाग होते. सर्वात उत्तरेकडील भागाचे नांव आनते होते. त्या प्रांताची राजधानी आनर्तपूर ऊर्फ आनंदपूर नांवाची होती. त्याच नगराला पुढे वृद्धपुर ऊर्फ बडनगर असें म्हणूं लागले. त्याचे दक्षिणेकडील भागास सुराष्ट्र म्हणत. सुराष्ट्र हैं नांव सूस नांवाचे लोकांवरून पडले. काठेवाडचे दक्षिण भागाला - १ मुंबई ग्याझेटियरच्या आधाराने हा भाग लिहिला आहे. नवव्या व दहाव्या शतकांतील शिलालेखावरून असे दिसते की, गुजरराठ हे नांव सांबर सरोवर व अजमीर याच्या उत्तरेच्या देशाला लागत असे, व दहावे शतकापासून तेराव्या शतकापावेतो हे नांव अन्हिलवाड्याच्या सोळंकी राज्याला लागत असे (Imperial Gazeteer Provincial Series, Bombay Presidency पृ० २०१)