________________
१२१ चंद्रवंशाच्या राजांपासून झाले आहेत अशी बहुतेक सर्व हिंदु लोकांची समजूत आहे. परंतु मि. व्हिसेंट स्मिथ यांचे असे म्हणणे आहे की, ही समजूत निराधार आहे. वास्तविक हे राजे परदेशांतून शक, युएची, व हूण वगैरे जे लोक आले त्यांचे वंशज होत. हा अभिप्राय स्पष्ट रितीने सिद्ध करतां येईल असा जरी पुरावा नाहीं, तथापि परिस्थिति या अभिप्रायास बरीच अनुकूल आहे. क्षत्रिय जात सर्वांशी नष्ट झाली हे म्हणणे खरे आहे किंवा कसे याचा जरी निश्चय करता आला नाही,तरी पवार, परिहार, चव्हाण व सोळंकी वगैरे कुळी गुर्जर नांवाच्या कुळीप्रमाणे हण लोकांचे वंशज आहेत असे दिसते. कनोजचे भोज वगैरे राजे गुर्जर जातीच्या प्रतिहार ऊर्फ परिहार कुळीचे असल्याचा शोध अलीकडे लागला आहे. जॅक्सन, भांडारकर व किलहॉर्न या विद्वानांनी ही गोष्ट निश्चित केली आहे. हे गुर्जर लोक हूण लोकांपैकी होते. पृथ्वीराज चव्हाण याची कथा ज्या चंद्रराईसा नांवाच्या काव्यांत दिली आहे, त्या काव्यांत पवार, परिहार, चव्हाण व सोळंकी ह्या जाती अबूचे पहाडावरील अग्निकुळांतून उत्पन्न झाल्या आहेत, असे म्हटले आहे. यावरून असे अनुमान निघतें की, या चार जाती परदेशस्थ असून अग्निहोमानें शुद्ध झाल्या व त्या क्षत्रिय बनल्या. तेव्हां परिहार कुळीप्रमाणे ह्या बाकीच्या कुळीही परदेशस्थ हूण जातींपैकींच असाव्यात असे मानण्यास हरकत नाही. __रजपुतांपैकी दक्षिण भागांतील कुळी, गोंड, भर, कोळ वगैरे ह्या देशांतील मूळच्या रहिवाशांपासून झाल्या असाव्यात. चंडेल रजपूत हे भर अथवा गोंड ह्या जातींपासून झाले असावेत. बुंदेले लोक, व उत्तरेकडील राठोर हे गहरवारीच्या शाखा आहेत. राष्ट्रकूट व राठोर या शब्दांची व्युत्पत्ति जरी एकच आहे, तरी त्यांच्यांत