________________
१२० नव्हता. याप्रमाणे बहार प्रांतांतील बौद्ध धर्माचा एका मुसलमानाच्या तरवारीने नाश झाला. त्याच्या कत्तलींतून जे यति वांचले ते तिबेट, नेपाळ व दक्षिण हिंदुस्तान या प्रांतांत पळून गेले. सेन घराण्याचा राजा राय लखमणिया याची राजधानी कलकत्त्याच्या उत्तरेस भागीरथीचे कांठी नुदिया ही होती. त्याने ८० वर्षे राज्य केलें असें म्हणतात. तो मोठा न्यायी व उदार होता, असा त्याचा लौकिक आहे. बहार काबीज केल्यानंतर पुढच्या वर्षी महंमद बंगाल जिंकण्याकरितां फौज घेऊन निघाला, व एके दिवशी सर्व फौज मागे ठेऊन १८ घोडेस्वारांनिशी नुदिया शहरांत आला. तो कोणी घोड्यांचा व्यापारी आहे असे समजून थेट राजवाड्याच्या दरवाजापाशी येईपर्यंत त्याला कोणी हरकत केली नाही. दरवाज्यातून आंत प्रवेश करण्याबरोबर त्याने आपली तरवार उपसली व वाड्यांतील लोकांवर हल्ला केला. राजा त्या वेळेस जेवीत होता. त्याला हे समजतांच तो वाड्याच्या मागच्या दरवाज्याने अनवाणीच पळाला. त्याच्या राण्या, दासी, इतर बायका, नोकर व सर्व खजीना महंमदाचे हाती सांपडला. महंमदाची फौज मागून आली तेव्हां त्याने सर्व शहराचा बंदोबस्त केला. राय लखमणिया हा जगन्नाथपुरीस पळून गेला व तेथेच तो मृत्यु पावला. गीतगोविंदाचा कर्ता प्रसिद्ध जयदेव कवि या राय लखमणिया ऊर्फ लक्ष्मण सेनचे राज्यांत झाला. याप्रमाणे बंगाल व बहार प्रांतांतील हिंदु राज्यांचा शेवट झाला. रजपूत कुळी. सांप्रतचे रजपूत राजे हे रामकृष्णादि प्राचीन सूर्यवंशाच्या व