________________
११९ रामपालानंतर पालवंशाचे पांच राजांनी राज्य केले. गोविंदपाल व इंद्रद्युम्न हे त्यांपैकी होते. पालवंशाचे राजांनी एकंदर ४५० वर्षे राज्य केले. मगध व मोंगीर प्रांत त्यांचे राज्यांत होते. धीमान व त्याचा मुलगा वित्तपाल हे फार कुशल चित्रकार होते. धर्मपाल व देवपाल यांचे कारकीर्दीत त्यांनी तलाव वगैरे लोकोपयोगी पुष्कळ कामें केली. (इ० स० ७८०-७९२) पालवंशानंतर सेन वंशाचे राजे झाले. ते ब्राह्मण जातीचे होते. कलिंग राजाचा सरदार सामंतदेव याने दक्षिणेतून येऊन काशीपुरी ( मयूरभंज संस्थानांतील सांप्रतचें काशिआरी नांवाचें गांव ) येथे एक लहानसें राज्य स्थापन केले. त्याचा नातू विजयसेन याने इ. स. १११९ चे सुमारास पालराजांचे ताब्यांतून बंगालचा बराच भाग हिरावून घेतला. इतर राजांशीही त्याने लढाया केल्या. त्याने सुमारे ४० वर्षे राज्य केले. विजयसेनाचा मुलगा बल्लाळसेन याने ब्राह्मण, वैद्य, व कायस्थ या जातींत कुलीन संप्रदाय सुरू केला. त्याने मगध, भूतान, चितेगांग, आराकान,. . आरिसा व नेपाळ या प्रांतांत ब्राह्मण उपदेशक पाठविले. इ. स. ११७० सालांत बल्लाळसेनानंतर त्याचा मुलगा लक्ष्मणसेन ऊर्फ राय लखमणिया राज्यारूढ झाला. इ. स. ११९३ चे सुमारास मुसलमानांच्या स्वारीमुळे पाल व सेन वंश नाहीसे झाले. त्या साली कुतुबुद्दीनचा सेनापति महंमद याने बहार प्रांत घेतला, व पुढचे साली नडिया शहर घेतले. बहारचा शेवटचा हिंदू राजा इंद्रद्युम्न नांवाचा होता. महंमदानें बहारचा किल्ला घेतला तेव्हां त्याला पुष्कळ लूट मिळाली. त्याने तेथील मुंडण केलेले सर्व संन्यासी यांची कत्तल केली. तेथे असले. ल्या पुस्तकांत काय लिहिले आहे हे समजून घेण्याची त्याला जेव्हां पुढे इच्छा झाली तेव्हां एकही मनुष्य ते सांगण्यास जिवंत राहिला