Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ राजाने समारे ४८ वर्षे राज्य केले. त्यानंतर काही वर्षे कांबोज नांवाच्या डोंगरी लोकांनी आपला अमल बसविला. त्यांना पाल वंशांतील नववा राजा महिपाल याने हांकून लाविलें. (इ. स. ९०८ अगर ९८०) पाल वंशांतील सर्व राजांपेक्षां याचंच नांव बंगाल प्रांतांत जास्त लोकप्रिय आहे, व त्याचेसंबंधाची गाणी अद्याप खेड्यापाड्यांत ऐकू येतात. त्याचे कारकीर्दीत तिबेटांत बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले. पंडित धर्मपाल व दुसरे साधुपुरुष मगध देशांतून तिबेटांत गेले. (१०१३)व बौद्ध धर्माचा त्या देशांत त्यांनी पुन्हां उद्धार केला. महिपाल १०३० चे सुमारास मृत्यु पावला. त्याने ५२ वर्षे राज्य केले. - इ० स० १०८० चे सुमारास दुसरा महिपाल नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याने आपले भावास बंदीत ठेविलें. राज्य फार अनीतीने केले. त्यामुळे राज्यांत बंडे उद्भवली. चसिकैवर्त कुळीचा मुख्य दिव्य ऊर्फ दिव्योक याने पुढाकार घेऊन महिपालास ठार मारिलें व राज्य आपल्या हाती घेतले. दिव्यानंतर त्याचा पुतण्या भीम हा राज्यकारभार पाहूं लागला. पुढे महिपालाचा माऊ रामपाल यानें कैदेतून आपली सुटका करून घेतली व राष्ट्रकूटांच्या साहाय्याने भीमाचा पराभव करून त्यास ठार मारिले व आपली गादी पुनः मिळविली. कैवर्त बंडाचा याप्रमाणे मोड केल्यानंतर रामपालाने मिथिल ऊर्फ उत्तर बहार प्रांत जिंकला. कामरूप प्रांतही त्याचे राज्यांत सामील झाला असावा. कारण, त्याचा मुलगा कुमारपाल याने त्या प्रातांचा पूर्ण अधिकार आपला प्रधान वैद्यदेव यास दिल्याचे वर्णन आहे. रामपालाचे कारकीर्दीत बौद्ध धर्माचा उत्कर्ष झाला. मगध देशांतील मठांत हजारों यति रहात होते, यावरून ही गोष्ट स्पष्ट होते.