________________
११३३ ) यांचा लौकिक विद्वान् लोकांस आश्रय दिल्याबद्दल आहे. या वंशांतील शेवटचा राजा चौथा जयसिंह नांवाचा होता. ( इ० स० १३१० ) त्यानंतर तोमार वंशाच्या राजाकडे व तोमारांच्या नंतर चव्हाण वंशाकडे धारा नगरचे राज्य गेले. इ० स० १४०१ साली मुसलमान राजे झाले. १९६९ साली अक बराने ते राज्य मोगल बादशाहीत सामील केलें. बहारचे व बंगालचे पाल वंश व सेन वंश. हर्ष राजाची सत्ता कामरूम आणि पश्चिम व मध्य बंगाल प्रांतांत होती. त्याचे मरणानंतर स्थानिक राजे स्वतंत्र झाले. इ. स. ७०० चे सुमारास आदिसूर नांवाचा गौड देशाचा राजा होता. त्यानें कनोजहून पांच ब्राह्मण व पांच क्षत्रिय आणविले व त्यांचेपासून बंगाल प्रांतांतील पुष्कळ प्रसिद्ध घराण्यांची उत्पत्ति झाली, अशी दंतकथा आहे. इ. स. ७३० ते ७४९ चे सुमारास गोपाळ नांवाचा बंगालचा राजा झाला. त्याने ४५ वर्षे राज्य केले. शेवटी शेवटीं मगध ऊर्फ बहार प्रांत त्याचे ताब्यात आला. त्याचा गुर्जरराजा वत्सराज याने पराभव केला. तो बौद्धधर्मी होता. त्याने उदंडपूर येथे एक मोठा मठ स्थापन केला. त्याचे वंशास पाल वंश म्हणतात. त्या वंशांतील दुसरा राजा धर्मपाल याने निदान ३२ वर्षे राज्य केले असावें. तिबेटचा इतिहासकार तारानाथ याचे म्हणणे असे आहे की, धर्मपालाचे राज्य बंगालचे उपसागर पासून तो दिल्ली, व जालंदरपावेतो, व दक्षिणेस विंध्याद्रीपावेतों होते. त्याने कनोजचा राजा इंद्रायुध यास पदच्युत करून त्याचे गादीवर चक्रायुधास बसविलें. (इ. स. ८०० ) प्रसिद्ध विक्रमशीला नांवाचा मठ त्यानेच स्थापन केला. त्यांत १०७ मंदिरें व सहा पाठशाळा होत्या. तिसरा राजा देवपाळ याचे लाऊसेन नांवाच्या सेनापतीने आसाम वं कलिंग हे प्रांत जिंकले. देवपाळ