Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ पापसूदन तलाव हे त्यानेच बांधिले. धार येथील गांगी ऊर्फ ' गांग्ली तेलीणकीलाट, ' याबद्दलची हकीकत मनोरंजक आहे. कारण “ कहां राजा भोज और कहां गांग्ली तेलीण' ही म्हण बहुतेक सर्व हिंदुस्थानांत प्रसिद्ध आहे. धार शहरांत लाट मशिदीजवळ एक प्रचंड लोखंडी खांब पडलेला आहे. भोज राजाने चालुक्यात जिंकलें व चेदीचा राजा गांगेयदेव याचा पराभव केला, तेव्हां त्याने हा विजयस्तंभ तयार केला असावा, व त्याचे मूळचे नांव गांगेय तेलिंगण लाट' असे असावे. त्याचा अपभ्रंश · गांग्ली तेलीण असा झाला असावा. कालांतराने मागील इतिहासाची विस्मृति झाल्यावर गांग्ली तेलीण कोणी राक्षसीण असावी व हा खांब, तिची तोल करण्याची दांडी असावी, व जवळ पडलेले प्रचंड धोंडे, हे तिची वजने असावीत अशी दंतकथा उदयास आली. . मांडू ऊर्फ मंडपदुर्ग येथें भोजराजाने किल्ला बांधिला व एक पाठशाळाही बांधिली. त्या पाठशाळेत पंडित भट्टगोविंद हे मुख्य अध्यापक असून, शेंकडों विद्यार्थी तेथें अध्ययनास होते. ____भोपाळ संस्थानांत भोजपूर तलाव त्याने बांधिला. त्याच्या कांहीं भिंती अद्याप उभ्या आहेत. पंधरावे शतकांत माळव्याचा हुशंगशहा यानें तो तलाव पाडून बुजवून टाकला. त्याचा विस्तार सुमारे दोनशे पन्नास चौरस मैल होता. हल्ली त्या सरोवराचे जागेवरून इंडियन मिड्लंड रेल्वे जात आहे. काश्मिरांतील पापसूदन सरोवर कुठर परगण्यांत कपाटेश्वर ऊर्फ कोठर या गांवीं आहे. ते बांधण्याकरितां भोज राजाने पद्मराज नांवाचे मनुष्यास द्रव्य पाठविले होते. भोजराजानंतर धारानगरचे अकरा . राजे झाले. त्यांत उदयादित्य ( १०५९-१०८१ ) व नरवर्मदेव ( ११० ४ ते