पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भोज राजाचा लौकिक मुख्यत्वेकरून त्याचे विद्वत्तेवरून व त्याने विद्वान् लोकांस दिलेल्या आश्रयावरून आहे. काव्यप्रकाशांत मंमट म्हणतो: यद्विद्वद्भवेनषु भोजनृपतेस्तत्यागलीलायितम् प्रबंधकाराचे लिहिण्यावरून मुंज व सिंधुराज यांचेपेक्षाही भोज राजाचा विद्वान् लोकांस आश्रय ज्यास्त उदार होता. भोज स्वतः शैव होता तथापि जैन विद्वानांना त्याचा मोठा आश्रय होता. प्रभाचंद्र नांवाचे जैन विद्वानाचे पायांची तो पूजा करीत असे, असे एका कानडी लेखांत लिहिले आहे. भोजाची इतर धर्माविषयीं सहानुभूति इतकी होती की, धार येथील शहाचंगाल साईचे कबरीवर एक लेख आहे, त्यांत असे म्हटले आहे:- भोज मुसलमान झाला व त्याने अबदुल्ला हे नांव धारण केले. ' अर्थात् या गोष्टींत सत्याचा यत्किंचितही अंश नाही. भोजाला कविराज असा जरी किताब दिला आहे, तरी त्याचे ग्रंथ धर्मशास्त्र, वैद्यकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, व व्याकरण या विषयांवरहि आहेत. त्याचे ग्रंथांपैकी सरस्वतिकंठाभरण व चंपूरामायण हे ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. विज्ञानेश्वराचे मिताक्षरांत भोजाचे ग्रंथांचा उल्लेख केला आहे. भोजाचे वेळचे विद्वान् लोकांपैकी धनपाल, कालिदास, उआत यांची नांवें प्रसिद्ध आहेत. हा कालिदास म्हणजे अर्थात् शाकुंतलाचा कर्ता नव्हे.. - भोजाचे राज्याचा विस्तार फारसा होता असे दिसत नाही. नर्मदेच्या उत्तरेस बुंदेलखंड व बाघेलखंड वजा केले असतां सांप्रतच्या मध्यहिंदुस्तानाइतका तो होता. दक्षिणेस मात्र तो गोदावरीपर्यंत होता. _भोज राजाने पुष्कळ मंदिरें बांधिली. धार येथील भोजशाळा. उजनीचे घांट, भोपाळ संस्थानांतील भोजपूर तलाव व काश्मिरांतील