________________
११४ ग्यान झालेल्या संवदांत फार मार्मिक रितीने केले आहे. तो श्लोक असा आहे:___ कालिंन्दि ब्रूहि कुम्भोद्भवजलधिरहं नाम गृण्हासि कस्मात् । शत्रोर्मे नर्मदाहं त्वमपि वदसि मे नाम कस्मात्सपत्न्याः ॥ मालिन्यं तर्हि कस्माद्वहसि ननु मिलत्कज्जलैौलवीनाम् ॥ नेत्राम्भोभिःकिमाप्तं समजनि कुपितः कुन्तलक्षोणिपालः ॥ नर्मदेचे पाणी काळे होण्याचे कारण माळव्याच्या कुलस्त्रियांनी आपल्या राजाच्या पराजयानिमित्त ढाळलेले कज्जलमिश्रित शोकाश्रु हे कवीने दिले आहे, यावरून तो पराभव माळव्याचे लोकांना बराच दुःखद झाला असावा असे मानण्यास हरकत नाही. या पराभवानंतर दोन्ही राजांची बरीच मैत्री झाली. ___ अन्हिलवाड्याचे भीमदेवाचे लढाईत आरंभी भोजराजाचा पराभव होऊन तो कैदही झाला होता. परंतु भीमदेवाने त्यास सोडून दिले. त्यानंतर काही दिवसांनी भोजराजाचा जैन सेनापति कुलचंद्र याने गुजराथच्या राजावर स्वारी करून त्याची राजधानी हस्तगत केली, व राजवाड्याचे दरवाज्यासमोर कवड्या पेरल्या, व अन्हिलवाड्यांकडून जयपत्र घेतले. पुढे भीमराजाचा वकील दामर ऊर्फ दामोदर याचे शिष्टाईमुळे दोन्ही राजांचे दरम्यान सख्य झाले. ( १०२३-१०६३ ) चेदीचा राजा गांगेयदेव याचे मरणानंतर त्याचा मुलगा प्रसिद्ध कर्णदेव हा राज्यारूढ झाला. आरंभी त्याचे व भोजाचे सख्य होते व भोजराजाने कर्णदेवास एक सोन्याची पालखी नजर म्हणून पाठविली. परंतु पुढे ही स्थिति अगदी बदलली, व इ. स. १०५९ साली कर्ण व अन्हिलवाड्याचा भीमराजा या दोघांनी मिळून धारेवर स्वारी केली, आणि भोजराजाचा पराभव करून त्यास त्याचे राजधानीतून हांकून लावले. यानंतर थोड्याच दिवसांनी भोजराजा मरण पावला.