________________
११३ मुंज राजाला मुलगा नसल्या कारणाने भोजाचे जन्मामुळे त्यास फार आनंद झाला. परंतु एका ज्योतिष्याने भोजाचे हातून तुझा नाश होणार आहे असे सांगितल्यावरून मुंज राजा भोजाचा छळ करूं लागला व त्यास मरण्याची त्याने आज्ञा केली. परंतु वररुचीने राजास सांगितले की " पंचाशत्पंच वर्षाणि सप्तमासं दिनत्रयं । .. भोजराजेन भोक्तव्यः स गौडो दक्षिणापथः ॥" ___ त्यावरून मुंज राजाने त्यास मारण्याचा बेत रहित केला. कांहीं दिवसांनी मंज राजाचे मनांत मत्सर उत्पन्न झाला, तेव्हां भोजराजाने पुढील कविता त्याजकडे लिहून पाठविली.: मान्धाता स महीपतिः कृतयुगालंकारभूतो गतः सेतुर्येन महोदधौ विरचितः क्वासौ दशास्यान्तकः ॥ अन्ये चापि युधिष्ठिरप्रभृतयो याता दिवं भूपते नैकेनापि समागता वसुमती मन्ये त्वया यास्यति ॥ आपला मत्सर व महत्वाकांक्षा या संबंधाची आपल्या पुतण्याची व्याजोक्ति मुंज राजाचे लक्षात येऊन त्याने भोजाचा छळ करण्याचे सोडून दिले. राज्यारोहणाच्या वेळेस भोजाचे वय अवघे पंधरा वर्षांचे होते. राज्यारोहणानंतर लवकरच त्याने उज्जनीऐवजी धार ही आपली राजधानी केली. चालुक्य, चेदी, गुजराथ या देशांच्या राजांशी भोजाच्या लढाया झाल्या. चालुक्यांशी झालेल्या लढाईत पांचव्या विक्रमादित्त्याचा त्याने पराभव केला व त्याला कैद करून ठार मारिलें. परंतु पुढे इ० स० १०१९ सालांत जयसिंहाने भोजाचा पराभव केला. इ० स० १०४० ते १०६९ चे दरम्यान सोमेश्वर आहवमल्ल चालुक्य याने भोज राजाचा मोठा पराभव केला. त्याचे वर्णन कुवलयानंद काव्यांत समुद्र व नमेदा यांचे दर